शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! YouTube च्या कमाईतून 'त्याने' खरेदी केली 50 लाखांची ऑडी; लिलावापासून वाचवलं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 15:01 IST

लॉकडाऊनच्या काळातच यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याच्या व्हिडिओंमध्ये, तो एका रिपोर्टरच्या भूमिकेत आहे आणि नव्या समस्यांवर विनोद करतो.

2020 मध्ये जेव्हा भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पण त्याचवेळी काही तरुणांनी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यशही मिळाले. अशाच एका तरुणाचे नाव आहे हर्ष राजपूत. 27 वर्षीय हर्ष राजपूत यूट्यूबवर कॉमेडी व्हिडीओ बनवतो. हर्ष राजपूतच्या चॅनलचे तब्बल 33 लाख सबस्क्राइबर्स आहेत.

हर्ष राजपूतचा सर्वात लोकप्रिय व्हिडीओ हा तब्बल 2 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, जो 10 मिनिटांचा कॉमेडी व्हिडीओ आहे. हर्ष राजपूतने आज तकला दिलेल्या माहितीनुसार, तो बिहारच्या औरंगाबादमधील जसोया गावचा रहिवासी आहे. युट्यूब एडसेन्समधून एका महिन्यात 8 लाख रुपये कमावल्याचे तो सांगतो. याशिवाय ते ब्रँड प्रमोशनमधून अतिरिक्त कमाई करतो.

जून 2022 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत, हर्षने एडसेन्समधून दरमहा सरासरी साडे चार लाख रुपये कमावले. हर्षचे वडील बिहार पोलिसात होमगार्ड असून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसाठी ड्रायव्हर म्हणून काम केले आहे. हर्ष स्वतःला ट्रेंड एक्टर म्हणतो. हर्षने सांगितले की, त्याने दिल्लीत थिएटर केले आणि पुढे मुंबई गाठली. याच दरम्यान, कोरोना आला आणि त्याला घरी परतावे लागले.

लॉकडाऊनच्या काळातच त्यांनी त्यांचे यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याच्या व्हिडिओंमध्ये, तो एका रिपोर्टरच्या भूमिकेत आहे आणि नव्या समस्यांवर विनोद करतो. काही दिवसांपूर्वीच हर्षने 50 लाखांची ऑडी A4 कार खरेदी केली आहे. कर्ज फेडलं नाही म्हणून त्याच्या घराचा लिलाव होणार होता. मात्र यूट्यूबच्या कमाईमुळे घराचा लिलाव होण्यापासून थांबला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :YouTubeयु ट्यूब