हरिद्वारमधील आर्यनगर चौकात रविवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. 'शौर्य दिना'निमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीदरम्यान त्यांच्यावर दगडफेक आणि ज्वलनशील पदार्थांनी हल्ला झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मोठा जमाव जमला. मात्र, पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
कार्यकर्त्यांचा आरोप काय?
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, दुर्गा चौकात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. तसेच, पेट्रोल बॉम्बसारखे ज्वलनशील पदार्थ फेकले. रविवारी संध्याकाळी बजरंग दलाची मिरवणूक आर्यनगर चौकात पोहोचताच संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि दगडफेकीचा आरोप करत निदर्शने केली.
पोलीस घटनास्थळी दाखल
याबाबत माहिती मिळताच एसपी सिटी अभय प्रताप सिंह आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त जमावाला शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना संध्याकाळपर्यंत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर निदर्शक शांत झाले. बजरंग दलाचे नेते अमित मुल्तानिया यांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध दगडफेक आणि ज्वलनशील पदार्थांनी हल्ला केल्याचा आरोप करत पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
गुन्हा दाखल
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आम्ही या आरोपांची गांभीर्याने चौकशी करत आहोत. आरोप खरे ठरल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल." या घटनेमुळे हरिद्वारमध्ये तणाव निर्माण झाला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त लावला आहे.
Web Summary : Stone pelting on a Bajrang Dal procession in Haridwar led to protests. Police intervened, calming the crowd after assurances of action. An FIR has been filed, and investigations are underway amid heightened security.
Web Summary : हरिद्वार में बजरंग दल के जुलूस पर पथराव हुआ, जिससे विरोध प्रदर्शन शुरू हो गए। पुलिस ने हस्तक्षेप कर कार्रवाई के आश्वासन के बाद भीड़ को शांत किया। प्राथमिकी दर्ज, सुरक्षा बढ़ाई गई है।