शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पाटीदार नेता हार्दिक पटेलची अजून एक कथित सीडी व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 14:04 IST

पाटीदार नेता हार्दिक पटेल याच्या कथित सेक्स सीडीवरून गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. या परिस्थितीत मंगळवारी हार्दिक पटेलची अजून एक सेक्स सीडी व्हायरल झाली आहे.

अहमदाबाद - पाटीदार नेता हार्दिक पटेल याच्या कथित सेक्स सीडीवरून गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. या परिस्थितीत मंगळवारी हार्दिक पटेलची अजून एक सेक्स सीडी व्हायरल झाली आहे.  या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि दोन तरुणी दिसत आहेत.हार्दिक पटेल याची एका महिलेसोबतचा कथित व्हिडीओ सोमवारी प्रसारित झाला होता. त्यानंतर वातावरण तापलेले असतानाच दुसरा व्हिडीओसुद्धा लीक झाला आहे. या व्हिडिओमध्ये असलेला तरुण हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे.  दरम्यान, हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून जोरदार -आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.   हार्दिक पटेलनेही चारित्र्यहननाच्या या प्रकाराचा सामना करण्याच आपण सज्ज असल्याचे संकेत देताना मी नामर्द नाही, जर व्हिडीओमधील व्यक्ती मी असतो तर थेट समोर आलो असतो, असे म्हटले होते. दुसरीकडे काल प्रसारित झालेल्या प्रकरणातील भाजपा कनेक्शन समोर आले आहे. ही व्हि़डीओ सीडी प्रसारित करणारा अश्विन सांकडसरिया याची मनसुख मांडविया यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसारित झाले होते. आता हे छायाचित्र समोर आल्यानंतर हार्दिक पटेल आणि काँग्रेसकडून भाजपावर होत असलेले हल्ले अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.   या व्हिडिओमागे भाजपचा हात असून गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण होत असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला होता. या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती आपण नसून, मला बदमान केल्यास हरकत नाही, पण या व्हिडिओमधूम गुजरातमधील महिलांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला. गुजरातमध्ये  हार्दिक पटेलचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला होता.  सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेलसारखा दिसणार तरुण एका महिलेसोबत बंद खोलीत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तारखेवरून हा व्हिडिओ मे महिन्यात शूट करण्यात आलेला असण्याची शक्यता आहे.  गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा माझी बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक आरोप पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं काही दिवसांपूर्वी केला होता.  ''मला बदनाम करण्यासाठी भाजपानं माझी बनवाट सेक्स सीडी बनवली आहे. ही सीडी बरोबर निवडणुकीपूर्वी जारी करण्यात येईल. याहून भाजपाकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणून प्रतीक्षा करा, पाहा आणि आनंद घ्या''. असे त्याने त्यावेळी म्हटले होते.  

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017