शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिकच्या उपोषणामुळे जुनागडमध्ये कलम 144 लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 13:24 IST

हे सरकार इंग्रजांप्रमाणे काम करत आहे, उपोषण रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असा आरोप हार्दिक पटेलने केला आहे. 

अहमदाबाद- पाटीदार आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आरक्षण सुरु केले आहे. आजपासून आपल्या घरामध्येच हार्दिकने अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केले. आपल्या भेटीसाठी येणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले जात आहे असा आरोप त्याने गुजरात सरकारवर केला आहे.

या उपोषणामुळे जुनागडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू केले आहे. सार्वजनिक जागेवर 4 पेक्षा अधिक लोकांनी जमण्यास बंदी घातली गेली आहे. हार्दिकने मात्र सर्व कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे असे स्पष्ट केले आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 25 ऑगस्ट 2015 रोजी गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण आंदोलन झाले होते. त्यामध्ये सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले होते आणि 14 लोकांनी आपले प्राण गमावले होते.अहमदाबादच्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर माझ्या समर्थकांना रोखण्यात येत आहे आणि आतापर्यंत 16 हजार लोकांना ताब्यात घेण्य़ात आले आहे. चार पेक्षा जास्त लोकांना घरापर्यंत जाण्याची परवानगी नाकारली आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्राची मागणी करण्यात येत आहे असा दावा हार्दिकने केला आहे. उपोषणासाठी मांडव आणि पाण्याची सोयही करण्यास मला मज्जाव केला जात आहे. या आंदोलनासाठी दोन महिने आधीच परवानगी मागितली होती मात्र परवानगी मिळाली नाही. हे सरकार इंग्रजांप्रमाणे काम करत आहे, उपोषण रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असा आरोप त्याने केला आहे. 

हार्दिकच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे ललित कथगरा, ललित वसोया, किरिट पटेल हे तीन पाटीदार नेतेही आले आहेत. सरकारने आपल्याला उपोषणासाठी परवानगी दिली नाही किंवा न्यायालयाने आपला जामिन रद्द केला तरी शनिवारपासून उपोषणाला बसणारच असा निर्धार हार्दिक पटेलने शुक्रवारी व्यक्त केला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेलच्या घराजवळ प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याच्या घरात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujaratगुजरातBJPभाजपा