शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हार्दिक पटेल काँग्रेसच्या बाजूने, भाजपाला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:52 IST

अहमदाबाद : पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्याने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा घोषित केला आहे.

अहमदाबाद : पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने मान्य केल्याने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा घोषित केला आहे. काँग्रेसने पाटीदार समुदायासाठी दिलेला आरक्षणाचा फॉर्म्युला एस.सी., एस.टी. आणि ओबीसी प्रवर्गासाठीच्या ५० टक्के आरक्षण कोट्याव्यतिरिक्त असेल, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर ते म्हणाले की, ही सर्वोच्च न्यायालयची केवळ सूचना आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पाटीदार समुदायाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसचे सरकार सर्वेक्षण करील. त्यानुसार विधानसभेत एक विधेयक मांडून आरक्षण दिले जाईल.विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांबाबत काँग्रेसशी कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही कोणत्याही जागेची मागणी केलेली नाही. तथापि, पाटीदार समुदायाच्या उमेदवारांना उभे करावे, असे आम्ही काँग्रेसला सांगितले आहे.पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या (पास) काही सदस्यांनी निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे? त्यांचे काय? असे विचारले असता हार्दिक पटेल म्हणाले की, ते आता आमच्या संघटनेचे सदस्य नसतील. ‘पास’च्या सदस्यांना ५० लाख रुपयांचे आमिष दाखवून भाजपने त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही हार्दिक यांनी केली.>आरक्षणाचा फॉर्म्युला नेमका कसा आहे?पाटीदार समुदायाला विशेष प्रवर्गातहत किती टक्के आरक्षण दिले जाईल, याचा निर्णय सरकारनियुक्त आयोगाच्या सर्वेक्षणानंतरच केला जाईल. फॉर्म्युल्यानुसार अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) घटकांच्या ४९ टक्के आरक्षणाला हात न लावता काँग्रेसने आरक्षणाचा आजवर लाभ न मिळालेल्या समुदायांना (राज्यघटनेतील परिच्छेद ३१ सी आणि ४६ तहत) आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती हार्दिक पटेल यांनी दिली.>आरक्षण मर्यादेचा उल्लेख नाहीच५० टक्क्यांव्यतिरिक्त आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या दृष्टीने कृती करण्यास सर्वोच्च न्यायालायने राजस्थान सरकारला मनाई केली होती. यावर हार्दिक पटेल म्हणाले की, ही (५० टक्के आरक्षणाची मर्यादा) सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. भारतीय राज्यघटनेत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेसंदर्भात कोणताही उल्लेख नाही. तेव्हा माझ्या मते ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येऊ शकते.>गुजरातेत माझा लढा भाजपाविरुद्ध आहे. त्यामुळे आमचा निवडणुकीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा असेल. कारण काँग्रेसने आमची आरक्षणाची मागणी मान्य केली आहे. निवडणूक जाहीरनाम्यातही आमच्या मागण्यांचा समावेश करण्याचा शब्द काँग्रसेने आम्हाला दिला आहे.- हार्दिक पटेल

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujaratगुजरातGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस