शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात दुसरीतील विद्यार्थ्याची शाळेत हत्या, बस कंडक्टरने केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:50 IST

हरयाणातील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये दुसरीत शिकणाºया ७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

गुरगाव : हरयाणातील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये दुसरीत शिकणा-या ७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर जेमतेम अर्ध्या तासाने हा प्रकार उघडकीस आला.गुरगावमधील भोंडसी परिसरातील सोहना मार्गावर रेयान इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेच्या टॉयलेटमध्ये प्रद्युम्न नावाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानंतर शाळेने लगेच पोलिसांना तसेच पालकांना बोलावून घेतले.पालकांना फोन करून, तुमचा मुलगा आजारी आहे, लगेच निघून या, असे कळविले. पालक शाळेत पोहोचल्यावरच त्यांना आपल्या मुलाची हत्या झाल्याचे समजले. प्रद्युम्नची गळा चिरून हत्या करण्यात आली. तो सकाळी सव्वाआठच्या सुमारास शाळेत आला. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच पावणेनऊच्या सुमारास त्याची हत्या झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने त्याच्या पालकांना दिली. शाळेने योग्य माहिती आपल्याला कळवलीच नाही. शाळा व्यवस्थापनाने वेळीच आपल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले असते तर त्याचा जीव वाचला असता, असा आरोप प्रद्युम्नचे वडील वरूण ठाकूर यांनी केला.बस कंडक्टरने केले कृत्य-हत्या झाल्याच्या काही तासांमध्ये पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली असून, अशोक कुमार असे त्याचे नाव आहे. त्याने हत्येची कबुली दिली आहे. अशोक कुमारने या सात वर्षांच्या या प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध करत हा चिमुकला ओरडू लागला. आपला भांडाफोड होईल, या भीतीने अशोकने अखेर चाकूने प्रद्युम्नचा गळा कापला आणि चाकू तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी सुरुवातीला दहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील काहिंनी अशोकला पळताना पाहिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाHaryanaहरयाणा