शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

VIDEO- खुनी मुलाला भेटून खूश आहात का ? पाक मीडियाचे जाधव कुटुंबीयांना उर्मट प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 12:16 IST

इस्लामाबाद-  पाकिस्तानच्या ताब्यात असलेले  भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव  भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व आई यांना अपमानास्पद वागणूक दिली.  कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे. कुलभूषण जाधव यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण यांच्या आई ...

ठळक मुद्देपाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व आई यांना अपमानास्पद वागणूक दिली.पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे.

इस्लामाबाद-  पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व आई यांना अपमानास्पद वागणूक दिली.  कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे. कुलभूषण जाधव यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्न विचारले.

कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी कुलभूषण यांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे बाहेर थांबले होते. याचदरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी त्यांना अपमास्पद प्रश्न विचारले. गुन्हेगार मुलाला भेटून आनंद झाला का? (अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं? ) तुमच्या पतीने हजारो निष्पाप पाकिस्तांनी लोकांच्या रक्ताने होळी खेळली आहे, याबद्दल काय सांगालं? (आपके पतिदेव ने हजारों बेगुनाह पाकिस्तानियों के खून से होली खेली है, इसके बारे में क्या कहती हैं आप?' ), असे प्रश्न पाकिस्तानच्या माध्यमांनी विचारले. 

 

इस्लामाबादमध्ये  पाक उच्चायुक्तालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची काचेच्या भिंतीआडून भेट झाली होती. त्यानंतर जाधव यांच्या पत्नी आणि आई शिपिंग कंटेनरमधून बाहेर पडताच पाकिस्तानी मीडियानं त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पाकिस्तानी पत्रकार त्यांना ओरडून ओरडून प्रश्न विचारत होते. 'या भेटीवर समाधानी आहात का? तुमच्या पतीने हजारो पाकिस्तानी नागरिकांना ठार मारलं, त्यावर तुमचं काय मत आहे?,' असे प्रश्न पाकिस्तानी पत्रकारांनी जाधव यांच्या पत्नीला केले. जाधव यांच्या आईलाही असेच अपमानास्पद प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्या. 

कुलभूषणच्या आई, पत्नीला काढायला लावले मंगळसूत्र, बांगड्या अन् टिकलीहीकुलभूषण यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांनी इस्लामाबादहून परत आल्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी सुरक्षेच्या नावाखाली या दोघींच्या सांस्कृतिक व धार्मिक भावनांचा अनादर केला गेला. यात त्यांना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळावरील टिकलीही काढून ठेवायला लावली व सुरक्षेच्या दृष्टीने गरजचे नसूनही पेहराव बदलायला लावला. जाधव यांच्या आईची मातृभाषा मराठी असल्याने त्यांनी मुलाशी त्या भाषेत बोलणे स्वाभाविक होते. परंतु त्या मराठीत बोलू लागल्यावर वारंवार त्यांना थांबविले गेले व शेवटी मराठी बोलणे बंद करायला लावले गेले.

पत्नी अनवाणी परतलीभेटीच्या खोलीत जाण्याआधी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. असे का केले गेले हे अनाकलनीय आहे.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानMediaमाध्यमे