कोलकता : हॅपी हार्मोन म्हणून ओळखले जाणारे डोपामाईन अत्यंत परिणामकारक असून या हार्मोनमुळे कर्करोगाचे ट्यूमरही मारले जातात असा निष्कर्ष कोलकता येथे जन्मलेल्या दोन संशोधकांनी केला असून वैद्यकीय क्षेत्रातील हा मोठा शोध ठरणार आहे. या हार्मोनचे उंदरावरील प्रयोग यशस्वी झाले आहेत. जर माणसावरील प्रयोग यशस्वी झाले तर कर्करोगावरील उपचार अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होतील. केमो उपचार घेण्यासाठी काही लाख रुपये खर्च येतो, तर डोपामाईन फक्त २५ रुपयात मिळू शकते, असे संशोधक पार्थ दासगुप्ता व सुजीत बसू यांनी म्हटले आहे. दासगुप्ता हे चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर बसू हे अमेरिकेतील ओहिओ विद्यापीठाच्या वेक्सनर मेडिकल सेंटरमध्ये प्राध्यापक आहेत. पेनिसिलीनप्रमाणेच हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे असा या संशोधकांचा दावा आहे. डोपामाईनवर प्रयोग करत असताना त्याचा हा गुण अपघाताने लक्षात आला आहे. (वृत्तसंस्था)
हॅपी हार्मोनमुळे ट्यूमरचाही नाश होतो
By admin | Updated: August 5, 2015 23:19 IST