पंतप्रधान मोदींकडून केजरीवालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By Admin | Updated: August 16, 2016 11:41 IST2016-08-16T11:41:42+5:302016-08-16T11:41:42+5:30

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दीक हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Happy birthday to Kejriwal by PM Modi | पंतप्रधान मोदींकडून केजरीवालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींकडून केजरीवालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दीक हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मोदी आपल्या सरकारला जाणीवपूर्वक अडचणीत आणतात.  सापत्नपणाची वागणूक देतात असा आरोप केजरीवाल करतात. 
 
त्याच अरविंद केजरीवालांना आज  त्यांच्या ४८ व्या वाढदिवसाच्या  मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अरविंद केजरीवालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो असे मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. 

Web Title: Happy birthday to Kejriwal by PM Modi