शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

By namdeo.kumbhar | Updated: August 25, 2017 16:34 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत. 

पुणे, दि. 24 - महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत. पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण देत होते. या संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सायंकाळी  पंतप्रधानांचे भाषण झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, साबरमती आश्रम निर्माण आणि चंपारण सत्यग्रहला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या स्वतंत्रता आंदोलनला या तिन्ही बाबींनी वेगळी दिशा दिली आहे. त्यामुळे इतिहासात या तिन्ही घटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवस कार्यक्रमाला प्रकाश जावेडकर आणि महादेव जाणकर यांनी उपस्थिती दर्शवली होती. बायफच्या कार्यक्रमात आज पुरस्कार वितरण करण्यात आले. बायफमधील सर्व विजेत्यांना मोदी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या. तसेच उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी शेती, शेतकरी आणि त्यांच्या समस्यावर भाष्य केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

मोदी यांनी यावेळी मराठीतून भाषणास सुरुवात केली. त्यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मराठीत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी अचानकपणे मराठीत बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी या कार्यक्रमातील पुरस्कार विजेत्यांचे मराठीतून अभिनंदन केले. त्यानंतर उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो, असे सांगत मोदींनी भाषणाचा समारोप केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छांचे स्वागत केले. मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNarendra Modiनरेंद्र मोदी