शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हनुमानाला 'सांताक्लॉज'च्या पेहरावानं वाद! पुजारी म्हणे, अमेरिकेच्या भक्ताने पाठवले कपडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 22:04 IST

गुजरातमध्ये एका पुजाऱ्यानं हनुमानाला सांताक्लॉजसारखे कपडे घातल्यानं मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे.

बोटाद- भगवान हनुमान हे दलित, मुस्लिम आणि आदिवासी असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत होती. भगवान हनुमानाच्या जातीचा वाद क्षमत नाही, तोच गुजरातमध्ये एका पुजाऱ्यानं हनुमानाला सांताक्लॉजसारखे कपडे घातल्यानं मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. बोटादमधल्या सारंगपूर मंदिरात विराजमान असलेल्या भगवान हनुमानाच्या मूर्तीला सांताक्लॉजसारखे कपडे घालण्यात आले आहेत. भगवान हनुमानाला दिवसातून दोनदा स्नान घातल्यानंतर कपडे परिधान करण्यात येतात, या विधींतर्गत हे कपडे भगवान हनुमानाला घालण्यात आले आहेत.मंदिराचे प्रमुख विवेक सागर म्हणाले की, अमेरिकेच्या एका भक्तानं हे सांताक्लॉजचे कपडे पाठवले आहेत. रविवारी हनुमानाला स्नान घातल्यानंतर थंडीपासून संरक्षण व्हावं, यासाठी हे कपडे घातल्याचे पुजाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. परंतु हे कपडे सांताक्लॉजच्या पोशाखासारखे दिसत आहेत. त्यामुळेच या कपड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान हनुमानाच्या जातीवरून वाद सुरू झाला होता.27 नोव्हेंबरला राजस्थान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथांनी हनुमान दलित असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पुढच्या दिवशी केंद्रीय मंत्री सत्यपाल चौधरी यांनी भगवान हनुमान हा आर्य समाजाचे असल्याचं सांगितलं होतं. हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते, असंही अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय म्हणाले होते. त्यामुळेच वाद निर्माण झाला होता.