शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार, हत्याप्रकरणी चौघा दोषींना फाशी द्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पालकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 08:50 IST

Crime News: दिल्लीतील नांगल भागात नऊ वर्षे वयाच्या एका दलित मुलीवर बलात्कार तसेच तिचा खून करून घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

नवी दिल्ली : दिल्लीतील नांगल भागात नऊ वर्षे वयाच्या एका दलित मुलीवर बलात्कार तसेच तिचा खून करून घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यावरून आता राजकारण तापले आहे. या प्रकरणातील चार दोषींना फाशी द्या, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व मुलीच्या नातेवाइकांनी केली आहे, तसेच केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतंत्रपणे या मुलीच्या पालकांना भेटून त्यांचे सांत्वन केले.मुलीच्या पालकांना दहा लाख रुपयांची मदत केजरीवाल सरकारने जाहीर केली आहे. दिल्ली ही केंद्र सरकारच्या अख्यत्यारीत येते. दलित मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणावरून विरोधी पक्ष टीका करत आहेत; मात्र या प्रकरणाबाबत एकाही केंद्रीय मंत्र्याने चकार शब्दही उच्चारलेला नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी व भाजप नेते संबित पात्रा यांच्यामध्येही या प्रकरणावरून शाब्दिक चकमक उडाली आहे. रविवारी  या मुलीवर घाईगर्दीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे फोरेन्सिक पुरावे गोळा करणाऱ्या पथकाला त्या मुलीच्या पायांचे अवशेष व चितेची राख इतक्याच गोष्टी हाती लागल्या. या बलात्कार व हत्याप्रकरणात अटक केलेला पुजारी राधेश्याम, त्याच्यासोबत काम करणारे सेवक लक्ष्मीनारायण व कुलदीप व स्थानिक रहिवासी सलीम या चौघांना फाशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मुलीच्या आईने या चार जणांची ओळख पटविली आहे. बलात्कारपीडित मुलीचे नातेवाईक नांगल भागात राहतात. या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवावे, अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरांतून होत आहे. दलित मुलीवरील बलात्कार प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण