नुकताच आपण सर्वांनी भाऊबीज सण साजरा केला. आपल्या भाऊ-बहिणींवर प्रेम दाखवण्यासाठी कित्येकांनी सोशल मीडियावर फोटो, काव्य, लेख या साहित्यांचा आधार घेतला. रक्षाबंधन आणि भाऊबीजेदिवशीच भाऊ किंवा बहिणींची आठवण काढणाऱ्या नेटकऱ्यांना मात्र एका फोटोने चांगलाच धडा मिळाला असेल. दिव्यांग असलेल्या एका बहिणीने आपल्या भावाला चक्क पायांनी ओवाळलं. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लोकांनी या भावा-बहिणींमधलं प्रेम असंच कायम राहावं, याकरता शुभेच्छाही दिल्या.
दिव्यांग बहिणीने असे ओवाळले भावाला, फोटो पाहून आवरणार नाहीत अश्रु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 19:16 IST
दिव्यांग बहिणीने भाऊबीजेला आपल्या भावाला असे ओवाळले आणि आशिर्वादही दिले.
दिव्यांग बहिणीने असे ओवाळले भावाला, फोटो पाहून आवरणार नाहीत अश्रु
ठळक मुद्देआपल्या भाऊ-बहिणींवर प्रेम दाखवण्यासाठी कित्येकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. अपंग असूनही ती तिच्या कामासाठी कोणावरच अवलंबून नसते. भाऊबीजेला आणि रक्षाबंधनाला ती आपल्या भावाला कधीच ओवाळू शकत नव्हती.