हमीरपूरः चौबेपूरमधील आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबे याला बुधवारी सकाळी एनकाऊंटरमध्ये यूपी एसटीएफने गोळ्या घालून ठार केले. हमीरपूरच्या मौदहा या चकमकीत अमर दुबेचा खात्मा करण्यात आला आहे. कानपूर प्रकरणानंतर अमर दुबे हासुद्धा फरार होता. यूपी एसटीएफच्या माहितीनुसार जेव्हा त्यांनी अमर दुबेला घेराव घातला, तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमर दुबे ठार झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक बुधवारी सकाळी साडेसहा वाजता करण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे की, अमर हा मौदहात त्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या घरी लपलेला होता. यापूर्वी तो फरीदाबाद येथे लपला होता, परंतु यूपी एसटीएफच्या शोध मोहिमेनंतर त्यानं तेथून पळ काढला होता. अशा परिस्थितीत एसटीएफने त्यांचा पाठलाग करत त्याला घेराव घातला असता, त्याने गोळीबार सुरू केला.
STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 08:16 IST