शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या एटीएममधून बाहेर आली दोन हजारांची अर्धी नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 10:29 IST

दिल्लीतील एका एटीएममधून चक्क दोन हजार रुपयाची अर्धी नोट बाहेर आली.

ठळक मुद्देदिल्लीतील एका एटीएममधून चक्क दोन हजार रुपयाची अर्धी नोट बाहेर आली. दिल्लीतील जामिया परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शादाब डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला.

नवी दिल्ली-  दिल्लीतील एका एटीएममधून चक्क दोन हजार रुपयाची अर्धी नोट बाहेर आली. एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढालया गेला असताना त्याला एटीएममधून दोन हजारांची अर्धी नोट मिळाली. दिल्लीतील जामिया परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शादाब डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. त्याने ज्यावेळी पैसे काढले तेव्हा त्याला एक विचित्र प्रकाराची दोन हजार रुपयांची नोट मिळाली. ही नोट अर्धीच छापलेली होती तर तिचा अर्धा भाग कोरा कागद होता. कोणीतरी फाटलेल्या नोटेला कागद जोडल्याचे शादाबला तेथे दिसून आलं. 

 

शाबादने एटीएममधू दहा हजार रूपये काढले होते. या दहा हजारांपैकी एक दोन हजार रूपयांची नोट खोटी बाहेर आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोहम्मद शाबाद या व्यक्तीचं येस बँकेत खातं आहे. एटीएममधून खोटी नोट बाहेर आल्यावर मी त्या संदर्भाती तक्रार ग्राहक सेवा अधिकाऱ्यांकडे केली. पण अधिकाऱ्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने मी पोलीसात तक्रार दाकल केल्याचं मोहम्मद शाबाद यांनी सांगितलं. 

शादाबने या प्रकरणाची बँक तसेच स्थानिक पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420 म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शादाबने एटीएममधून दहा हजार रुपये काढले. ज्यामध्ये दोन हजार, ५०० आणि १००च्या नोटांचा समावेश होता. मात्र त्याने नोटा मोजल्या त्यावेळी त्याला ही कागद जोडलेली नोट आढळून आली. दरम्यान, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.