शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

... तर छत्तीसगडचे अर्धे लोक सिद्ध करू शकणार नाहीत नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 07:00 IST

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे प्रतिपादन । बहुतांश नागरिकांचे पूर्वज अशिक्षित; ५० ते १०० वर्षांपूर्वीचे दस्तावेज आणायचे कुठून?

रायपूर : छत्तीसगडमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांकडे जमिनी नाहीत आणि जमिनीचे कुठले रेकॉर्ड नाही. त्यामुळे ‘राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर’ची (एनआरसी) अंमलबजावणी केल्यास हे लोक आपले नागरिकत्वच सिद्ध करू शकणार नाहीत, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.

बघेल यांनी पत्रकारांना सांगितले की, छत्तीसगडमध्ये २.८० कोटी लोक राहतात. यातील अर्ध्यापेक्षा जास्त नागरिकांचे पूर्वज अशिक्षित होते. भूमिहीन होते. त्यांच्याकडे कसलेही दस्तावेज नव्हते. ते राज्याच्या विविध खेड्यांत अथवा इतर राज्यांतही स्थलांतरित झाले. त्यांच्या वंशजांनी ५० ते १०० वर्षांपूर्वीचे दस्तावेज कुठून आणायचे? १९०६ साली इंग्रजांनी ओळख पडताळणी योजना आणली होती. या योजनेला महात्मा गांधी यांनी पूर्ण शक्तिनिशी विरोध केला होता. मी एनआरसीला विरोध करीन.

कर्नाटकातील हिंसाचाराची चौकशी करणार -येदीयुरप्पा

मंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी शनिवारी हिंसाचारग्रस्त मंगळुरू शहराला भेट देऊन पाहणी केली.नंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘हिंसाचाराची चौकशी केली जाईल. तसेच पीडिताना कायद्यानुसार भरपाई दिली जाईल. संचारबंदी उठविली जावी, अशी शहरातील प्रत्येकाची इच्छा आहे.

आज ३ ते ६ या काळात संचारबंदी उठविली जाईल. उद्या संपूर्ण दिवसभर संचारबंदी नसेल. रात्रीची संचारबंदी मात्र कायम राहील.’ मंगळुरूत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले होते.केरळमध्ये काँग्रेसचे आंदोलन तीव्रकोची : केरळमध्ये काँग्रेसने शनिवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलन तीव्र केले. शनिवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. ज्येष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्निथला, मुल्लापल्ली रामचंद्रन, शशी थरूर, बेनी बेहनन आणि एम. एम. हसन यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.सरकारने हटवादी भूमिका सोडावी -मायावतीलखनौ : ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’प्रकरणी सरकारने हटवादी भूमिका सोडून द्यावी आणि हे निर्णय मागे घ्यावेत, असे आवाहन बसपा नेत्या मायावती यांनी केले आहे. मायावती यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ला आता रालोआमध्येच विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे सरकारने हटवादी भूमिका सोडून हे निर्णय मागे घ्यावेत.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसKeralaकेरळmayawatiमायावती