शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

हापूसची निम्मी निर्यात आखाती देशांमध्ये; युद्ध लांबल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:57 IST

आखाती देशांमधील युद्ध लांबल्यास त्याचा फटका आंबा निर्यातीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : आखाती देशांमधील युद्ध लांबल्यास त्याचा फटका आंबा निर्यातीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण निर्यातीपैकी जवळपास ५० टक्के निर्यात फक्त नऊ आखाती देशांमध्ये होत असते. यावर्षी हंगाम उशिरा सुरू होत असल्यामुळे अद्याप निर्यात सुरू झालेली नाही. युद्ध थांबले नाही तर निर्यात घटून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय आंब्याला जवळपास ५८ देशांमधून मागणी असते. २०२५ मध्ये ३३,३३० टन आंबा निर्यात झाला होता. या व्यापारातून ४९६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यामध्ये ४६ टक्के वाटा सहा आखाती देशांचा आहे. 

आंबा निर्यात अद्याप सुरू झालेली नाही. मार्च अखेरीस निर्यात सुरू होईल. आखाती देशातील युद्ध लवकर संपले नाही तर त्याचा फटका निर्यातीला बसण्याची शक्यता आहे.संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट 

आखाती देशांमध्ये हापूसची झाली होती २२९ कोटींची निर्यात

आखाती देशांमध्ये गतवर्षी १६,१५६ टन निर्यात झाली होती. या माध्यमातून २२९ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.  एकूण विदेशी व्यापारापैकी ३४ टक्के वाटा एकट्या संयुक्त अरब अमिरातीचा आहे. आंबा निर्यातीमुळे शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध होते. याशिवाय स्थानिक बाजारपेठेमध्येही भाव वाढण्यास मदत होत असते. 

यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. मार्चचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही अद्याप कोकणच्या हापूसची अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. हवामान बदलाच्या संकटामध्ये आता युद्धाचीही भर पडली आहे. युद्ध लवकर संपले नाही तर त्याचा परिणाम निर्यातीवर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. निर्यातीसाठी पर्यायी देशांशी चाचपणी करावी लागण्याची शक्यता आहे. 

२०२५ मध्ये आखाती देशांत निर्यात

देश               निर्यात (टन)        उलाढाल (कोटींत)यूएई                   १२९११                    १७०कुवेत                   ११५६                    २६कतार                   १३३९                   २०.८७बहरिन                 ३८८                    ५.७६सौदी अरेबिया       ३३७                    ५.०५इराण                    २२.९८                ०.४८

टॅग्स :Mangoआंबा