शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

देशातील तब्बल दीड कोटी बोगस रेशनकार्ड रद्द

By admin | Updated: June 27, 2016 06:11 IST

रेशनवस्तुंवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात वर्षाला सुमारे १० हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे केंद्रीय वित्त सचिव अशोक लावासा यांनी सांगितले.

नवी दिल्ली : देशातील एकूण ११ कोटी कुटुंबांकडे असलेल्या रेशनकार्डांपैकी सुमारे १.६० कोटी रेशनकार्ड बनावट किंवा ड्युल्पिकेट असल्याचे उघड झाल्यानंतर ही कार्डे रद्द करण्यात आली आहेत व यामुळे रेशनवस्तुंवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात वर्षाला सुमारे १० हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे केंद्रीय वित्त सचिव अशोक लावासा यांनी सांगितले.याखेरीज स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची योजना (डीबीटी) राबविल्यामुळे सरकारचे आणखी १४,८७२ कोटी रुपये वाचले आहेत, असेही लावासा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.‘डीबीटी’ योजनेसाठी लाभार्थीचे बँक खाते आणि त्याचा आधार क्रमांक यांची सांगड घातली जाते व त्यामुळे बनावट लाभार्थी वगळले जाऊन सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ फक्त पात्र लाभार्थींनाच मिळून त्यातील गैरप्रकारांना आळा बसतो. सरकारच्या विविध १५० योजनांचे लाभ या वर्षाच्या अखेरपर्यंत अशाचप्रकारे डीबीटी पद्धतीने देणे सुरु केले जाईल, असे वित्त सचिव म्हणाले.लावासा म्हणाले की, डीबीटीमुळे वाचलेल्या पैशाचे आकडे योजनानिहाय भिन्न आहेत व सर्व योजनांमध्ये एकूण किती पैसे वाचले याची अंतिम आकडेवारी अद्याप काढलेली नाही. परंतु सुरुवातीच्या संकेतांनुसार देशभरात १.६ कोटींहून अधिक बनावट रेशनकार्ड यामुळे उघड होऊन ती रद्द झाली आहेत व त्यामुळे वर्षाला सुमारे १० हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.अशाच प्रकारे स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान डीबीटीने थेट बँक खात्यांत जमा करण्याच्या ‘पहल’ योजनेमुळे ३.५ कोटी बनावट किंवा ड्युप्लिकेट ग्राहक उघड झाले असून त्यामुळे वर्षाला अनुदानामध्ये १४,९८२ कोटी रुपयांची बचत शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘मनरेगा’मध्येही डीबीटीचा अवलंब केल्याने असंख्य बोगस ‘जॉब कार्ड’ उघड होऊन सन २०१५-१६ मध्ये १० टक्के खर्चात बचत शक्य झाली आहे. डीबीटी योजनेचा सध्या सुमारे ३१ कोटी लाभार्थींना थेट लाभ मिळत आहे. (वृत्तसंस्था)>केरोसिन, रेशनचे धान्यही डीबीटी पद्धतीनेकेरोसिनचे अनुदानही डीबीटी पद्धतीने देण्यात येणार असून त्यासाठी लवकरच ३३ निवडक जिल्ह्यांत पथदर्शक योजना राबविली जाईल.याच वर्षी रेशनचे धान्य आणि खते यांचे अनुदानही डीबीने देण्याची प्रायोगिक योजना काही जिल्ह्यांमध्ये सुरु केली जाईल.सध्या ६५ योजनांचे लाभ डीबीने दिले जात आहेत. वर्षअखेर १५० योजनांना डीबीटी लागू केली जाईल.सरकारच्या विविध खात्यांच्या शिष्यवृत्यांविषयीची एकत्रित माहिती देण्यासाठी एक राष्ट्रीय पोर्टल तयार करण्यात येत आहे.