शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ताप, टायफाइडमुळे रुग्णांची वाईट अवस्था,'या' शहरात परिस्थिती गंभीर: रुग्णालये भरली खचाखच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:08 IST

सध्या सुशीला तिवारी रुग्णालयात दररोज 2000 हून अधिक ओपीडी चालवल्या जात आहेत. बहुतांश रुग्णांना ताप, सर्दी, कावीळ, टायफॉइडची लागण होते.

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच इतरही अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे. याच दरम्यान उत्तराखंडच्या हल्दवानी शहरात असलेल्या सुशीला तिवारी सरकारी रुग्णालयात सध्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अनेक एकरात पसरलेल्या या रुग्णालयात संपूर्ण कुमाऊंमधून रुग्ण उपचारासाठी येतात. 650 बेडची क्षमता असलेले हे रुग्णालय कुमाऊंमधील सर्वात मोठे रुग्णालय आहे. रूग्णांना रुग्णालयात बेडच मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत रुग्णालयामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती.

सध्या सुशीला तिवारी रुग्णालयात दररोज 2000 हून अधिक ओपीडी चालवल्या जात आहेत. बहुतांश रुग्णांना ताप, सर्दी, कावीळ, टायफॉइडची लागण होते. याच दरम्यान ज्या रुग्णांची प्रकृती अधिक बिघडली आहे त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. रूग्णांच्या नातेवाईकांची रूग्णालयात राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना रूग्णालयाच्या आवारात कॉरिडॉर किंवा इतर ठिकाणी मुक्काम करावा लागत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात व्हायरल ताप, सर्दी, कावीळ, टायफॉइडचे रुग्ण वाढत आहेत. दररोज शेकडो रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. रुग्णालयातील सर्व बेड भरले आहेत. त्यानंतरही डॉक्टर आणि कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. डॉ.अरुण जोशी पुढे म्हणाले की, येथून एकही व्यक्ती उपचाराविना निघून जाऊ नये, असा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

रुग्णांना दाखल करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार केला जात आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या सुशीला तिवारी रुग्णालयातील उपचार इतर सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आहेत. इथे ओपीडीचा फॉर्म पाच रुपये आहे. तर हल्द्वानीच्या बेस हॉस्पिटलच्या ओपीडी प्रिस्क्रिप्शनसाठी 28 रुपये मोजावे लागतात. त्याच बरोबर एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, MRI यासह सर्व प्रकारच्या चाचण्या देखील अत्यंत कमी खर्चात केल्या जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडhospitalहॉस्पिटल