शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हाफिज सईदचे निकटवर्तीय निवडणुकीच्या रिंगणात; भारताची पहिली प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 18:05 IST

मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचे निकटवर्तीय पाकिस्तानात निवडणुका लढवत आहेत.

India On Hafiz Saeed: येत्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड (Mumbai Blast Mastermind) हाफिज सईदचे (Hafiz Saeed) अनेक नातेवाईक या निवडणुकीत हात आजमावत आहेत. याबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया आली आहेत. तसेच, दहशतवादी हाफिज सईदला भारताच्या स्वाधिन करण्याची विनंती पाकिस्तानला करण्यात आल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी (डिसेंबर 29) मीडियाशी संवाद साधला. यावेळी हाफिज सईदच्या निवडणूक लढवणाऱ्या जवळच्या सहकाऱ्यांबाबत बोलताना म्हणाले की, “आम्ही याबाबत काही अहवाल पाहिले आहेत. पण, एखाद्या देशातील अंतर्गत बाबींवर भाष्य करणार नाही. अशा संघटनांचा राजकारणात प्रवेश नवीन नाही. हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे."

हाफिज सईदच्या प्रत्यार्पणावर म्हणाले...हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावर अरिंदम बागची म्हणाले की, “हाफिज सईद भारतात अनेक प्रकरणांमध्ये वॉन्टेड आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीतही त्याचे नाव आहे. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये त्याच्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याचे प्रत्यार्पण करण्याची विनंती आम्ही पाकिस्तानला केली आहे." 

काय आहे संपूर्ण प्रकरण?गुरुवारी (28 डिसेंबर) पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दावा केला होता की, हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी यावर प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर