शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हादियाची इच्छा पूर्ण; डॉक्टरकी शिकणार, वडिलांना आनंद, धर्मांतर व लग्न स्वेच्छेने केल्याची जबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:18 IST

केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, त्याबद्दल हादियाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, त्याबद्दल हादियाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे.सेलमच्या कॉलेजने हादियाला प्रवेश देऊन तिची तेथे होस्टेलवर राहण्याची व्यवस्था करावी आणि केरळ सरकारने तिला तेथे सुरक्षितपणे नेऊन पोहोचवावे, असा आदेश सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. शिकत असताना हादियाच्या पालकत्वाची जबाबदारी कॉलेजच्या अधिष्ठात्यांवर सोपविली आहे. हिंदू अखिलाने शफीन जहाँ या मुस्लीम तरुणाशी धर्मांतर करून प्रेमविवाह केला. मात्र तिला फितवून मुसलमान केले गेले व तिच्याशी विवाह केला गेला, अशी तक्रार करत तिच्या वडिलांनी याचिका केल्यावर केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह रद्दबातल केला होता. त्याविरुद्ध तिच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले.माझा खर्च पतीच करेलहादियाला सोमवारी बंदोबस्तात न्यायालयापुढे आणले गेले. मी शफीन जहाँशी स्वेच्छेने लग्न केले आहे. माझे धर्मांतर कोणी बळजबरीने केलेले नाही व यापुढेही मला मुस्लीमच राहायचे आहे, असे हादियाने न्यायालयास सांगितले. मला शिकायचे आहे. त्यासाठी सरकारने खर्च करण्याची गरज नाही. माझा पती तो खर्च करण्यास समर्थ आहे, असेही तिने सांगितले.

टॅग्स :KeralaकेरळCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय