शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांची बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 01:45 IST

कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांचे आघाडी सरकार असले आणि लोकसभा निवडणुकांसाठी दोन पक्षांत समझोता झाला असला, तरी तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांचे आघाडी सरकार असले आणि लोकसभा निवडणुकांसाठी दोन पक्षांत समझोता झाला असला, तरी तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. तुमकुर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे देवेगौडा यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली, तर आम्ही अर्ज मागे घेऊ , असे या नेत्यांनी जाहीर केले आहे.जनता दल (सेक्युलर)च्या संस्थापकांविरोधातच काँग्रेसचे दोन नेते उभे राहिल्याने तुमकुरमध्ये पेच निर्माण झाला आहे. या दोघांनी अर्ज मागे घ्यावेत, असा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. त्यापैकी एक तुमकुरचे काँग्रेसचे खासदार मुद्दाहणुमे गौडा आहेत, तर दुसरे काँग्रेसचे माजी आमदार के. एन. राजण्णा हे आहेत.देवेगौडा यांचे घराणे :देवेगौडा यांचा मुलगा कुमारस्वामी मुख्यमंत्री आहे. कुमारस्वामी यांची पहिली पत्नी अनिता या विधानसभा सदस्य आहेत. देवेगौडा यांचे दोन नातू निखिल (कुमारस्वामी यांचा मुलगा) व प्रज्वल रेवण्णा (कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा) हेही आता रिंगणात आहेत. म्हणजेच देवेगौडा, कुमारस्वामी, त्यांची पत्नी आणि दुसरा मुलगा रेवण्णा व त्यांचा मुलगा असे सहा जण राजकारणात आहेत.तुमकुर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार १0 वेळा विजयी झाले आहेत. देवेगौडा आतापर्यंत हसन मतदारसंघातून निवडून येत असत. त्यांनी आपल्या नातवासाठी ती जागा सोडली आणि जनता दलाचा बालेकिल्ला असलेला मंड्या मतदारसंघातही दुसरा नातू निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ८५ वर्षांचे देवेगौडा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत, असा अंदाज होता, पण देवेगौडा यांनी तुमकुर मतदारसंघ निवडला. दोघा काँग्रेस नेत्यांनी अर्ज मागे न घेतल्यास देवेगौडा यांना अडचणीचा सामना करावा लागेल.

टॅग्स :Karnatakकर्नाटकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक