शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

Gyanvapi Mosque Asaduddin Owaisi: "मी फक्त अल्लाहला घाबरतो, कुठल्याही योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही म्हणूनच..."; AIMIM चे ओवेसी यांची गुजरातमधील सभेत वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 5:52 PM

ओवेसींनी विरोध करणाऱ्या मुस्लीम संघटनांनाही विचारले सवाल

Gyanvapi Mosque Asaduddin Owaisi:  ज्ञानवापी मशीदीच्या मुद्द्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याच मुद्द्याबाबत बोलताना AIMIM चे नेता असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं. "मी या मुद्द्यावर बोलतच राहणार. कारण मी फक्त अल्लाला घाबरतो, बाकी कोणाचीही मला भीती नाही. योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही", असं ते म्हणाले. गुजरातमधील छापी या ठिकाणी ते एका सभेत बोलत होते.

"मी जेव्हा ज्ञानवापी मुद्द्यावर बोलण्यास सुरूवात केली, त्याच वेळी काही मुस्लीम संघटनांनी माझ्यावर टीका करायला सुरूवात केली. त्या संघटनांनी मलाच विचारलं की तुम्ही या मुद्द्यावर कशाला बोलता? मला असे प्रश्न विचारणाऱ्यांना मी विचारू इच्छितो की मी जर बोललो नाही तर तुम्ही या मुद्द्यावर तोंड उघडणार आहात का? जे लोक मला 'बोलू नका' असं सांगत आहेत, त्यांनी स्वत:तरी या मुद्द्यावर बोलावं. मी या साऱ्यांना सांगतो की, मी बोलतच राहणार. कारण मला अल्लाची सोडून इतर कोणाचीही भीती वाटत नाही. मी योगी किंवा मोदी यांना घाबरत नाही", असे विधान ओवेसींनी गुजरातमध्ये केले.

"मी बोलतो कारण मी जिवंत आहे. माझ्यात अजूनही जीव शिल्लक आहे. मी बोलतो कारण मी अजूनही माझ्या धर्माशी इमान राखलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मी बोलत आणि बोलतच राहणार कारण मी फक्त अल्लाह ला घाबरतो. कोणत्याही योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही. मला बोलण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला मी बोललेल्या गोष्टी आवडत नसतील तर तुम्ही स्वत:च्या कानात बोटं घाला, पण मी मात्र बोलायचा थांबणार नाही", असे ओवेसी म्हणाले.

मुस्लीम संघटनांवरही केले सवाल

हिजाबचा जेव्हा मुद्दा चर्चेत होता, त्यावेळी मुस्लीम संघटना बोलल्या नाही. मांसाहाराचा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळीही तुम्ही कोणीही बोलला नाहीत. मुस्लीम युवकांना नोकऱ्या दिल्या जात होत्या, त्यावेळी त्याला जॉब जिहाद असं नाव दिलं गेलं, पण तेव्हाही मुस्लीम संघटनांनी तोंड उघडलं नाही. मग आता मशिदीच्या विषयावर आम्ही न्यायपालिकेत जाऊन रितसर आमची बाजू मांडत आहोत, तर आम्हाला 'तुम्ही का बोलता?' असा सवाल का केला जातोय", अशा शब्दांत त्यांनी मुस्लीम संघटनांवरही नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Mosqueमशिदyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन