ग्यानदासांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे : महंत हरिगिरी महाराज
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
त्र्यंबकेश्वर : मी महंत आहे की नाही हे आमच्या आखाड्यातील साधूंना माहीत आहे. मी आखाडा परिषदेचा महामंत्री आहे की नाही हेही आखाड्यातील सर्व साधूंना तसेच आखाडा परिषदेच्या पदाधिकार्यांना माहीत आहे. आपण लोकशाही पद्धती मानतो आणि आखाड्यातील पदाधिकार्यांची, साधू-महंतांची व षड्दर्शन आखाडा परिषद पदाधिकार्यांची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. त्यामुळे माझ्या पदाची चिंता ग्यानदास यांनी करू नये. मी काही स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवून घेत नाही, असे परखड मत जुना आखाड्याचे महंत तथा संरक्षक हरिगिरी महाराज यांनी ग्यानदासजींच्या वक्तव्यावर व्यक्त केले.
ग्यानदासांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे : महंत हरिगिरी महाराज
त्र्यंबकेश्वर : मी महंत आहे की नाही हे आमच्या आखाड्यातील साधूंना माहीत आहे. मी आखाडा परिषदेचा महामंत्री आहे की नाही हेही आखाड्यातील सर्व साधूंना तसेच आखाडा परिषदेच्या पदाधिकार्यांना माहीत आहे. आपण लोकशाही पद्धती मानतो आणि आखाड्यातील पदाधिकार्यांची, साधू-महंतांची व षड्दर्शन आखाडा परिषद पदाधिकार्यांची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. त्यामुळे माझ्या पदाची चिंता ग्यानदास यांनी करू नये. मी काही स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवून घेत नाही, असे परखड मत जुना आखाड्याचे महंत तथा संरक्षक हरिगिरी महाराज यांनी ग्यानदासजींच्या वक्तव्यावर व्यक्त केले.विशेष म्हणजे, हरिगिरी महाराज राजस्थान येथे गेल्यावर ग्यानदास यांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांचे काल त्र्यंबक येथे आगमन झाल्यानंतर आज ते पत्रकारांशी दिलखुलासपणे बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, काँग्रेस सरकारचे राज्य चांगले होते. भुजबळांनी चांगली कामे केली. नाशिक-त्र्यंबक रस्ता उत्तम केला. आणि या मतांवर मी कायम आहे. लोकशाहीत सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणी चांगले काम केले तर त्याच्या कामाचे कौतुक करणे गुन्हा आहे काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. यापूर्वी मी मुलायमसिंह, मायावती, आजम खान यांच्याही कामाचे कौतुक केले होते. पालकमंत्री महाजन समस्या जाणून घेत नाहीत, तर जिल्हाधिकारी फोन घेत नाहीत. कधी मीटिंगमध्ये असतात, कधी नंतर बोलतो म्हणतात. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नाही. पालकमंत्र्यांना फोन केला तर त्यांचा पी.ए.च फोनवर त्यांची गाठ होऊ देत नाही. मग आमच्या समस्या आम्ही कोणाला सांगायच्या?आजही तुम्ही पाहा, नीलपर्वतावर जाण्याचा रस्ता असो अगर पिंपळदकडे जाण्याचा रस्ता असो, हा रस्ता चांगला केला आहे काय? रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत व बाजूने खचला आहे, तडे गेले आहेत. सहा शेडपैकी दोन शेड अजून अपूर्णच आहेत. या ठिकाणी संपूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. कामे निकृष्ट झाली आहेत. त्यांनी पुढे असेही म्हटले की, जिल्हाधिकारी म्हणतात सर्व आखाड्यांपेक्षा जुन्या आखाड्यासाठी पाच कोटींची कामे झाली आहेत. मग एवढा निधी कुठे खर्च केला, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. प्रशासन मला आलोचक समजते. त्यासाठीच मला एखाद्या खोट्या आरोपावरून ते तुरुंगात डांबायलादेखील मागेपुढे पाहणार नाही, असे शेवटी हरिगिरी म्हणाले.