शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांसह पत्नी अचानक झाली बेपत्ता; सात वर्षांनंतर सापडताच पतीला बसला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 13:39 IST

सात वर्षांपूर्वी दोन मुलांसह पत्नी बेपत्ता; अखेर पोलिसांनी शोधून काढलं

ग्वाल्हेर: सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली पत्नी आणि मुलं अखेर पतीला सापडली. मात्र तिला पाहून पतीला धक्का बसला. पोलिसांनी पत्नीला शोधून काढलं. मात्र पत्नीनं तिच्या प्रियकरासोबत विवाह करून संसार थाटला होता. पत्नीचा प्रियकर ४ मुलांचा बाप आहे. सात वर्षांनंतर सापडलेल्या पत्नीनं प्रियकरासोबतच राहायचं असल्याचा हट्ट धरला. त्यामुळे पतीला जबर धक्का बसला.

ग्वाल्हेरच्या हजिरामध्ये वास्तव्यास असलेल्या जितेंद्र सिंह कुशवाहचा विवाह १५ वर्षांपूर्वी सबलगढच्या सुधा जादौनसोबत झाला. लग्नानंतर सुधानं जितेंद्रकडे सबलगढमध्येच राहण्याचा आग्रह धरला. त्यामुळे दोघे सबलगढमध्ये सुनील जादौनच्या घरात भाड्यानं राहू लागले. लग्नानंतर दोनच वर्षात सुधाला एक मुलगा, एक मुलगी झाली. काही वर्षांनंतर जितेंद्र सुधासोबत ग्वाल्हेरच्या हजिरामध्ये राहू लागला. यादरम्यान जितेंद्रला राजस्थानातल्या जयपूरमध्ये कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. पत्नी सुधा आणि दोन मुलांना ग्वाल्हेरमध्ये ठेवून जितेंद्र नोकरीसाठी जयपूरला गेला. दुबईत नोकरी लागली, कौतुकही झालं; आई- भावासोबत जेवली अन् मग वेगळाच निर्णय घेतला!

मार्च २०१४ पासून सुधा ७ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाली. घरमालकानं जितेंद्रला याची माहिती दिली. सुधाला शोधण्यासाठी जितेंद्र जयपूरहून ग्वाल्हेरला आला. त्यानं ग्वाल्हेरपासून सबलगढपर्यंत सुधाचा शोध घेतला. मात्र ठावठिकाणा समजला नाही.

ग्वाल्हेरमध्ये पोलिसांनी बेपत्ता महिलांच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कानची सुरुवात केली. ग्वाल्हेर पोलिसांनी सुधाचा शोध सुरू केला. सुधाच्या कुटुंबीयांनी घरमालक सुनील जादौनवर संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले. सुनीलचं लोकेशन महिन्यातून १० ते १५ दिवस उत्तर प्रदेशातल्या वृंदावनमध्ये असल्याचं आढळलं. त्यामुळे पोलिसांनी वृंदावनमध्ये शोधाशोध सुरू केली. तेव्हा सुधा सापडली. मात्र तिनं पतीसोबत राहण्यास नकार दिला.