शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या 'त्या' शिक्षकाला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 18:58 IST

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर एका शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल झाले होते.

नवी दिल्ली, दि. 7 - सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर एका शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल झाले होते. व्हायरल झालेले फोटोंमुळे विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर त्या शिक्षकाला आज अटक करण्यात आली आहे.हा प्रकार आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात असलेल्या काटलीचेरा येथील शाळेत घडला आहे. येथील स्थानिक DY-365 वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, फैजुद्दीन लष्कर असे या शिक्षकाचे नाव असून त्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत फोटोशूट केले होते. हे फोटोशूट करताना शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह फोटो काढले होते. या फोटोमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील स्पर्श केल्याचे दिसून येत होते. तसेच आक्षेपार्ह असे  विद्यार्थिनींना मिठीत घेतल्याचे दिसत आहे. फोटोशूट केल्यानंतर शिक्षकाने सर्व फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेले फोटो काही तासाभरात सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी यावर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी त्यावेळी आरोपी शिक्षकाची फक्त चौकशी केली होती. मात्र आज अखेर त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी पोलीस अधिकारी शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, या शिक्षकाने विद्यार्थिनींना काय सांगून या अशा प्रकारे फोटोशूट केले होते. याबद्दल अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. याचबरोबर, याआधीही या शिक्षकावर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.