शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गुवाहाटी दौऱ्याला ११ जणांची दांडी; आमदार बच्चू कडू मात्र सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 08:22 IST

सत्तेत आल्यानंतर तब्बल ४० दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच राज्याचा कारभार पाहिला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई ते गुवाहाटी या शिंदे गटाच्या गाजलेल्या दौऱ्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतले आणि मुख्यमंत्री झाले. आता एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदार आणि समर्थक खासदार पुन्हा कामाख्या देवीला जाणार हे निश्चित झाले होते.  सर्वानुमते ठरल्यानुसार २६ नोव्हेंबरला कामाख्या देवीचे दर्शन झालेही, मात्र या दौऱ्यातून चार मंत्री, चार आमदार आणि तीन खासदार यांनी काढता पाय घेतल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटात पुन्हा नाराजी तर नाही ना, अशा चर्चा रंगल्या.

सत्तेत आल्यानंतर तब्बल ४० दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच राज्याचा कारभार पाहिला. नंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात ९ आमदारांनाच संधी मिळाली होती. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी पसरली होती, आमदार संजय शिरसाट, बच्चू कडू यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली. आमदारांतील नाराजीची चर्चा सुरू असताना गुवाहाटी दौरा ठरला. २१ नोव्हेंबर तारीख ठरली, पण ऐनवेळी रद्द झाली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन तारीख जाहीर होईल, असे जाहीर केले. पण जेव्हा २६, २७ नोव्हेंबर ही तारीख ठरली तेव्हा प्रत्यक्षात गुलाबराव पाटीलच या दौऱ्यात सामील झाले नाहीत. 

अनुपस्थित आमदार, खासदार

कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे अनुपस्थित राहिले. सत्तारांनी कृषी प्रदर्शन, तानाजी सावंतांनी आरोग्य शिबिर, गुलाबराव पाटील यांनी दूध संघ निवडणूक, शंभूराज देसाई यांनी लग्नकार्याचे कारण दिले. त्याचप्रमाणे आमदार महेश शिंदे, चंद्रकांत पाटील, अनिल बाबर, संजय गायकवाड, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे यांनीही अनुपस्थितीचे वैयक्तिक कारण दिले.

बच्चू कडू दौऱ्यात सामील : मंत्रिपदावरून ज्यांच्या नाराजीची सर्वाधिक चर्चा रंगली ते बच्चू कडू मात्र या दौऱ्यात सहभागी झाले. आमदार राणा यांच्या ५० खोक्यांच्या आरोपांमुळे कडू आणि राणा यांच्यात टोकाचा वाद सुरू झाला होता. 

टॅग्स :Mumbaiमुंबईguwahati-pcगौहतीBachhu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदे