शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

AAP नेत्याचे पंतप्रधानांच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द; स्मृती इराणी म्हणाल्या, “त्या गटाराच्या तोंडासारखे…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 09:54 IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुजरात आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी गुजरात आम आदमी पार्टीचे (AAP) प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल इराणी यांनी इटालिया यांचा ‘गटर माऊथ’ असा उल्लेख केला. गोपाल इटालिया यांना जामीन मिळाला आहे. एक व्हिडिओ शेअर करताना स्मृती इराणी यांनी गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

“अरविंद केजरीवाल, गटरासारखं तोंड असलेल्या गोपाल इटालिया यांनी तुमच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीरा बा यांच्याविरोधात अपशब्द काढले. मला कोणतीही नाराजी व्यक्त करायची नाही, गुजराती किती नाराज आहेत हेही दाखवायचं नाही. परंतु तुम्हाला जनतेने पाहिलंय हे जाणून घ्या. गुजरात निवडणुकीत तुमचा पक्ष नष्ट होईल,” असे इराणी म्हणाल्या.कायआहेप्रकरण?आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इटालिया यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एनसीडब्ल्यूने त्यांना गुरूवारी दिल्लीत चौकशीसाठी बोलवले होते.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर गोपाल इटालिया चर्चेत आले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या होत्या. दरम्यान, त्यांचा आता जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह टीप्पणी करत असल्याचे दिसत आहे. तसेच दुसऱ्या व्हिडिओत ते महिलांसंदर्भातही आक्षेपार्ह बोलत असल्याचे दिसत आहे. गोपाल इटालिया हे गुजरात मधील पाटीदार समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. ते याअगोदरही वादामध्ये सापडले होते. ते सध्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे काम करत आहेत. आम आदमी पक्षाने गुजरात मधील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपGujaratगुजरात