शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीमचा उद्या फैसला, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:51 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्याविरोधात आणखी दोन हत्येप्रकरणी उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. यादरम्यान, हरयाणामधील पंचकुला येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

पंचकुला, दि. 15 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्याविरोधात आणखी दोन हत्येप्रकरणी उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. यादरम्यान, हरयाणामधील पंचकुला येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गेल्या 25 ऑगस्ट रोजी गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयच्या न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्याला कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांची हत्या केल्याचा आरोप गुरमीत राम रहिम याच्यावर आहे. विशेष म्हणजे, या हत्येच्या खटल्याची सुनावणी सुद्धा सीबीआयच्याच न्यायालयात उद्या (दि. 16) होणार आहे.  पंचकुला येथील सेक्टर एकमधील न्यायालयाच्या आवारात आणि आजूबाजूच्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निमलष्करी दल आणि पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती, हरयाणाचे पोलीस महासंचालक बीएस संधू यांनी दिली आहे. दरम्यान, गुरुमीत राम रहीम याच्यावरील बलात्कार प्रकारणाची सुनावणी करतेवेळी पंचकुला परिसरात त्याच्या एक लाखहून अधिक समर्थकांनी धुडगूस घातला होता. तसेच, त्यांनी माध्यमांच्या ओबी व्हॅन्ससह इतर वाहनांची जाळपोळ केली होती. मात्र, आता या परिसरात एकही समर्थक याठिकाणी आला नसल्याची माहिती सुद्धा पोलीस महासंचालक बीएस संधू यांनी दिली. याचबरोबर, गुरमीत राम रहिम याला उद्या हत्येप्रकरणाची सुनावणी करण्यासाठी त्याला सीबीआयच्या कोर्टात हजर करण्याची शक्यता कमी आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेलमध्येच होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 38 जण ठार झाले. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहे. दरम्यान, गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांची हत्या 2002 मध्ये झाली होती.  

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमCourtन्यायालय