शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदासपूर पोटनिवडणुकीत भाजपा-काँग्रेसची सत्त्वपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:06 IST

भाजपा नेते आणि सिनेस्टार विनोद खन्ना यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात बुधवारी (दि. ११) मतदान होत आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : भाजपा नेते आणि सिनेस्टार विनोद खन्ना यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात बुधवारी (दि. ११) मतदान होत आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या लोकप्रियतेची ही चाचणी असणार आहे. या निकालाच्या आधारे भाजपा अन्य राज्यांतील सात मतदारसंघांतील लोकसभेच्या पोटनिवडणुकांची रणनीती आखणार आहे. विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता या भाजपाकडून उमेदवारीच्या स्पर्धेत होत्या. पण, पक्षाने ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे उद्योजक स्वर्ण सलारिया यांना उमेदवारी दिली.काँग्रेसने दिवंगत नेते बलराम जाखड यांचे चिरंजीव सुनील यांना उमेदवारी दिली आहे. आम आदमी पार्टीने मेजर जनरल (सेवानिवृत्त) सुरेश खजुरिया यांना मैदानात उतरविले आहे. २०१४ मध्ये भाजपाने या मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यानंतर भाजपा व अन्य विरोधी पक्षातील राजकीय लढाई सुरूच आहे. पण, बदलती राजकीय समीकरणे आणि अर्थव्यवस्थेतील कमजोरीमुळे काँग्रेसला पुनरुज्जीवनाची अपेक्षा आहे.लोकसभेच्या पोटनिवडणुका ज्या सात मतदारसंघांत होणार आहेत त्यात अररिया (बिहार), गोरखपूर आणि फूलपूर (उत्तर प्रदेश), अल्वर आणि अजमेर (राजस्थान), अनंतनाग (जम्मू-काश्मीर) आणि उलुबेरिया (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि केशवप्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अनुक्रमे गोरखपूर आणि फूलपूर या जागा रिक्त झाल्या आहेत. तर, अन्य पाच जागांवरील विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. अररियामधील निवडणूक भाजपा - जदयू आघाडीला अवघड आहे. कारण, २०१४ मध्ये या जागेवर मोदी लाटेतही राजदचे तस्लिमुद्दीन हे विजयी झाले होते. उलुबेरियातही भाजपाचा फारसा प्रभाव नाही. जम्मू - काश्मीरातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा व पीडीपी उत्सुक नाहीत.गुरुदासपूरमधील जागा राखण्याबाबत भाजपा नेतृत्व उत्साही दिसत नाही. भाजपाचे उमेदवार स्वर्ण सलारिया यांचे एका महिलेसोबतचे फोटो समोर आल्यानंतर येथे मोठा वाद झाला. गृहमंत्री राजनाथ सिंह अथवा अरुण जेटली यांनी गुरुदासपूरमध्ये प्रचारासाठी वेळ काढला नाही. यावरून हे दिसून येते की, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे या पोटनिवडणुकीसाठी सहजपणे काम करताना दिसत नाहीत. पण, दुसºया प्रमुख नेत्यांनाही का दूर ठेवण्यात आले. अकाली दलाकडून भाजपाला पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सुखबीर बादल हे या मतदारसंघात गत दहा दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा