शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या 'नीच' राजकारणात भाजपाला पडला निवडणूक जाहीरनाम्याचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:52 IST

भाजपाकडून व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात येईल असे बोलले जात होते. पण अद्यापपर्यंत तरी भाजपाने जाहीरनाम्यातून मतदारांना कुठलेही वचन दिलेले नाही.

ठळक मुद्देभाजपा जाहीरनामा टाळत आहे त्यावरुन ते गुजरातच्या जनतेचा किती अनादर करतात ते दिसते असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे.

अहमदाबाद - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वापरलेल्या नीच शब्दावरुन गुजरातमध्ये सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. या नीच शब्दाच्या राजकारणात गुजरात भाजपाला निवडणूक जाहीरनाम्याचा विसर पडला आहे.  गुजरातमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाला 24 तासांपेक्षा कमी वेळा राहिलाय पण भाजपाने अजूनही निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यावरुन विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. काल दुपारी पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 

भाजपाकडून व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात येईल असे बोलले जात होते. पण अद्यापपर्यंत तरी भाजपाने जाहीरनाम्यातून मतदारांना कुठलेही वचन दिलेले नाही. भाजपाचा कट्टर विरोधक हार्दिक पेटलनेही टि्वट करुन निशाणा साधला आहे. भाजपा सेक्स सीडी बनवण्यामध्ये भरपूर व्यस्त आहे. त्यामुळे ते निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करायला विसरले असे टि्वट हार्दिक पटेलने केले. 

 

भाजपाची खिल्ली उडवताना त्याने हसणारे चार इमोजीही टि्वट केले आहेत. याच मुद्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही भाजपावर टीका केली. भाजपा जाहीरनामा टाळत आहे त्यावरुन ते गुजरातच्या जनतेचा किती अनादर करतात ते दिसते असे राहुल गांधी म्हणाले. गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. 

 

'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत' 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं आहे. सूरतमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. ते बोलले की, 'उच्च आणि नीच या गोष्टी त्यांच्या संस्कारातच नाहीत. या सर्व गोष्टी त्यांनाच लख लाभो'. याआधी मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका केली होती.  मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाहीकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. ते बोललेत की, 'भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर टीका करताना नेहमीच असभ्य भाषेचा वापर केला आहे. काँग्रेसची संस्कृती आणि वारसा वेगळा आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका करताना वापरलेल्या भाषेचं समर्थन होऊ शकत नाही. मी आणि काँग्रेस पक्ष त्यांनी माफी मागावी अशी अपेक्षा करतो'.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017