शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काँग्रेसच्या 44 आमदारांची गुजरातवापसी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 12:39 IST

फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये पाठवण्यात आलेले गुजरात काँग्रेसमधील 44 आमदारांची सोमवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये वापसी झाली आहे

बंगळुरू/ अहमदाबाद, दि. 7 - फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये पाठवण्यात आलेले गुजरात काँग्रेसमधील 44 आमदारांची सोमवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये वापसी झाली आहे. गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविले होते. गेल्या 10 दिवसांपासून काँग्रेसचे हे 44 आमदार बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये राहत होते. 

सोमवारी पहाटे जवळपास 4.45 वाजण्याच्या सरदार वल्लभभाई एअरपोर्टवर पोहोचलेल्या सर्व आमदारांना अहमदाबादपासून जवळपास 77 किलोमीटर अंतरावर असलेल्या निजानंद रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. या आमदारांना निवडणुकीपर्यंत येथेच ठेवण्यात येणार आहे. 

आमदारांच्या सुरक्षेसाठी एअरपोर्टबाहेर रविवारीच सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार बंगळुरूमध्ये ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते ते कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांचे होते.  बुधवारी ( 2 ऑगस्ट )सकाळी आयकर विभागाने  डी.के. शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला होता. तसंच काँग्रेस आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते त्यावरही आयकर विभागाने छापेमारी केली होती. भाजपाने सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.   

44 आमदार होते बंगळुरूमध्ये  

गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलवले होते. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले होते की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलवण्यात आले. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.