शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात जिंकवले, गावात हरले! सीआर पाटील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? प्रमोशनची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 09:26 IST

पाटलांमधील क्षमतांचा वापर कसा करून घ्यावा याची सध्या भाजपात चर्चा सुरु आहे. अर्थातच मोदींचा आशिर्वाद असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत.

नुकत्याच पार पडलेल्या गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले होते. गेल्या २५ वर्षांपासून सत्ता असली तरी एवढ्या जागा जिंकता आल्या नव्हत्या. त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटलांना दिले होते. गुजरातमधील मोठ्या विजयानंतर पाटलांच्या प्रमोशनवर पक्ष श्रेष्ठी विचार करत आहेत. 

पाटील यांना कोणती जबाबदारी द्यावी यावरून चर्चा सुरु आहे. पाटील हे नवसारीमधून तीनवेळा खासदार आहेत. यामुळे पाटलांना केंद्रात मंत्रीपद देऊन राजकीय दृष्ट्या महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्याची चर्चा देखील होत आहे. तसेच भाजपाच्या केंद्रीय टीममध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत त्यांना काम देऊन नड्डांचा उत्तराधीकारी बनविण्याची देखील चर्चा होत आहे. 

पाटील यांनी २०२३ मध्ये काय भूमिका राहिल याचे चित्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होणार आहे. जेपी नड्डा २०२४ पर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष राहतील अशी चर्चा आहे. यासाठी त्यांना मकर संक्रांतीच्या आसपास एका वर्षाची मुदतवाढ दिली जाईल. नड्डांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. नड्डा हे सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. पाटीलांनाही सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 

पाटलांमधील क्षमतांचा वापर कसा करून घ्यावा याची सध्या भाजपात चर्चा सुरु आहे. अर्थातच मोदींचा आशिर्वाद असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत. पाटलांशिवाय महामंत्री रत्नाकर यांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे. रत्नाकर हे युपीचे असून गुजरातची जबाबदारी सांभाळण्यापूर्वी बिहारमध्ये काम करत होते. भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाला आहे. याशिवाय लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जनककृष्णमूर्ती, वेकेन्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा आणि जेपी नड्डा हे आतापर्यंत अध्यक्ष झाले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरात