शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अहमदाबादमध्ये घेतली अदानींची भेट, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 20:12 IST

अदानी समूह भारतीय विद्यार्थ्यांना दरवर्षी २ लाख पौड्सच्या पाच स्कॉलरशीप देऊन ब्रिटनमध्ये मास्टर्स डिग्रीचं शिक्षण घेण्यास मदत करणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain PM Boris Johnson) यांनी गुरूवारी उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांची भेट घेतली. अहमदाबादमधील शांतिग्राम येथे असलेल्या अदानी ग्लोबल हेडक्वार्टरमध्ये ही भेट झाली. या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी ब्रिनटनच्या पंतप्रधानांचं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. ब्रिटनच्या इतिहासात कोणत्याही कार्यरत असलेल्या पंतप्रधानांनी यापूर्वी गुजरातचा दौरा केला नव्हता.

अदानी समुहाच्या जागतीक मुख्यालयात बोरिस जॉन्सन आणि गौतम अदानी यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात झाली. भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणं हा यामील उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी एनर्जी ट्रांझिशन, क्लायमेट अॅक्शन, एअरोस्पेस, डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि ह्युमन कॅपिटलसारख्या क्षेत्रातील विकासासह अन्य मुद्द्यांवर चर्चा केली.

यापूर्वी गौतम अदानी आणि बोरिस जॉन्सन यांची भेट गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये झाली होती. यामध्ये दोघांनी क्लिन एनर्जी पोहोचवण्याच्या विषयावर करत असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा केली होती. अदानी समूहाचे अध्यक्ष आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यातील आजच्या बैठकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संरक्षण क्षेत्रातील सहभाग हा होता. भारताने २०३० पर्यंत सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी ३०० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे आणि OEM क्षमता अधिक बळकट करून संरक्षण क्षेत्रातील निर्यात केंद्र म्हणून भारताची स्थापना करण्याचे अदानींचे उद्दिष्ट आहे.विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीपआत्मनिर्भर भारतअंतर्गत, अदानी समूह आणि युकेच्या सुप्रसिद्ध कंपन्या एकत्रितपणे एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञानाची रचना आणि विकास करण्यासाठी एकत्र काम कसे करू शकतात यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान गौतम अदानी यांनी भारतीय तरुणांसाठी शेवनिंग स्कॉलरशिपची घोषणाही केली. ही ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिपपैकी एक आहे. अदानी समूह भारतीय विद्यार्थ्यांना दरवर्षी २ लाख पौड्सच्या पाच स्कॉलरशीप देऊन ब्रिटनमध्ये मास्टर्स डिग्रीचं शिक्षण घेण्यास मदत करणार आहे. यावेळी अदानी यांनी इंडिया युके क्लायमेट सायन्स अँड टेक्नॉलॉजी समिटसाठीही बोरिस जॉन्सन यांना निमंत्रण दिलं. ते २८ जून २०२२ पासून लंडनमध्ये सुरू होणार आहे.

टॅग्स :AdaniअदानीBoris Johnsonबोरिस जॉन्सनGujaratगुजरातahmedabadअहमदाबाद