शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा आणि हिंदू देवतांवर टीका करणाऱ्या गुजरातच्या कॉमेडियनला अटक

By मोरेश्वर येरम | Updated: January 2, 2021 18:18 IST

स्थानिक भाजप आमदाराच्या मुलाने फारुकी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

गुजरात स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला इंदूर पोलिसांनीअटक केली आहे. इंदूर येथे आयोजित एका 'कॉमेडी शो'मध्ये हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अभद्र भाषेत टीका केल्याचा आरोप फारुकी याच्यावर करण्यात आला आहे. 

स्थानिक भाजप आमदाराच्या मुलाने फारुकी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी मुनव्वर फारुकी आणि त्याच्यासह चार अन्य लोकांना अटक केली आहे. 

नेमकं प्रकरण काय?इंदूरमध्ये     सेक्टर ५६ येथील एका कॅफेमध्ये शुक्रवारी नववर्षाच्या स्वागतासाठी 'कॉमेडी शो'चं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिक आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौर यांचा मुलगा एकलव्य सिंह गौर (३६) आपल्या मित्रांसह उपस्थित होता. कार्यक्रमात केल्या गेलेल्या काही टिप्पणींवर एकलव्य याने आक्षेप घेतला आणि कार्यक्रम थांबवला. त्यानंतर कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजसह एकलव्य यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. 

मुनव्वर फारुकी हे मुळचे गुजरातच्या जुनागडचे रहिवासी आहेत. व्हिडिओ फुटेजच्या आधारावर पोलिसांनी फारुकी आणि त्यांच्यासोबतच्या चार इतर लोकांविरोधात तक्रारीची नोंद केली आहे. 

"मी आणि माझे काही मित्र तिकीट खरेदी करुन या कार्यक्रमाला उपस्थित होतो. कार्यक्रमाला फारुकी हे प्रमुख कॉमेडियन म्हणून उपस्थित होते. यावेळी फारुकी यांनी अभद्र टिप्पणी करत हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवली. त्यानंतर गोध्रा हत्याकांड प्रकरणावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला गेला", असं एकलव्य गौर म्हणाले. यासोबतच इतर गोष्टींवरुनही या कार्यक्रमात चुकीच्या गोष्टींवर भाष्य सुरूच होतं. याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला, असंही ते पुढे म्हणाले. 

कोरोना काळात प्रशासनाची परवानगी न घेता या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचाही आरोप एकलव्य गौर यांनी केला आहे. कार्यक्रमात कोरोना संबंधिचे नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचेही उल्लंघन करण्यात आले, असंही एकलव्य यांचं म्हणणं आहे.  

टॅग्स :GujaratगुजरातPoliceपोलिसArrestअटक