नवी दिल्ली - गुजरात दंगली प्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) क्लीन चिट दिल्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दिवंगत खासदार एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी याचिका दाखल केली आहे. झाकिया जाफरी यांच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांकरिता तहकूब करण्यात आली असून, एका बाजूने सुनावणी तहकूब करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या सुनावणीत झाकिया जाफरी यांचे वकील अपर्णा भट यांनी कोर्टाला सांगितले की, या प्रकरणातील विषय वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यास आतापर्यंत स्थगिती देण्यात यावी.यावर सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ म्हणाले की, यावरील सुनावणी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे, जे काही आहे ते आम्हाला काही दिवस ऐकावे लागेल. एक तारीख ठरवून सर्व उपस्थित असतील याबाबत सुनिश्चितता करा. २७ फेब्रुवारी २००२ ते मे २००२ या कथित "मोठ्या षडयंत्र" बाबत या याचिकेवर नोटीस बजावणे आवश्यक असल्याचे वकिल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. विशेष म्हणजे २८ फेब्रुवारी, २००२ रोजी, गुलबर्ग सोसायटीत गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेसच्या कोचला लागलेल्या आगीत ५९ जण ठार झालेल्या घटनेच्या एक दिवसानंतर ६८ जणांचा मृत्यू झाला होता. एहसान जाफरी हेही ठार झालेल्यांमध्ये एकजण होते. घटनेच्या सुमारे दहा वर्षांनंतर ८ फेब्रुवारी २०१२ मध्ये एसआयटीने मोदी व अन्य ६३ जणांना क्लीन चिट देऊन 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला.
गुजरात दंगलीः नरेंद्र मोदींना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटविरोधातील याचिकेवर सुनावणी तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 18:33 IST
Gujarat riots: गेल्या सुनावणीत झाकिया जाफरी यांचे वकील अपर्णा भट यांनी कोर्टाला सांगितले की, या प्रकरणातील विषय वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यास आतापर्यंत स्थगिती देण्यात यावी.
गुजरात दंगलीः नरेंद्र मोदींना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटविरोधातील याचिकेवर सुनावणी तहकूब
ठळक मुद्देजाकिया जाफरी यांच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केली