शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात दंगलीशी सबंधित 9 पैकी 8 खटले बंद, 'या' प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 17:45 IST

'इतका वेळ निघून गेल्यानंतर आता या प्रकरणांवर सुनावणी करण्यात काही अर्थ नाही.'

नवी दिल्ली: गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीशी संबंधित 9 पैकी 8 खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या सर्व प्रकरणांशी संबंधित अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होत्या. सरन्यायाधीश यूयू ललित यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले की, इतका वेळ निघून गेल्यानंतर आता या प्रकरणांवर सुनावणी करण्यात काही अर्थ नाही. दरम्यान, अन्य एका प्रकरणात न्यायालयाने कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना दिलासा मिळावा म्हणून अपील करण्याची परवानगी दिली.

सुप्रीम कोर्टाने सांगितले की, गुजरात दंगलीशी संबंधित 9 पैकी 8 प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयांनी निकाल दिला आहे. दंगलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या म्हणजेच NHRCच्या याचिकेचा यात समावेश आहे. न्यायालयाने दंगलग्रस्तांच्या रिट याचिका आणि सिटीझन्स फॉर जस्टिस नावाच्या एनजीओचाही विचार केला. 2003-2004 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत एनजीओने गुजरात पोलिसांकडून दंगलीचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती.

9 पैकी 8 खटल्यांची सुनावणी पूर्णसरन्यायाधीश यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात हा निकाल दिला. या खंडपीठात न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांचा समावेश आहे. खंडपीठाने सांगितले की, गुजरात दंगलीशी संबंधित 9 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच एसआयटी स्थापन केली आहे. त्यापैकी 8 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. नरोडा गावाशी संबंधित खटल्याची सुनावणी अद्याप सुरू आहे. खंडपीठाने सांगितले की, पीडित कुटुंबांच्या वकीलांनीही एसआयटीच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे सर्व प्रकरणांना काही अर्थ नाही. त्यामुळे या याचिकांवर अधिक विचार करण्याची गरज नाही, असे न्यायालयाचे मत आहे. 

नरोडा प्रकरणात एसआयटी कायदेशीर पावले उचलू शकतेएसआयटीचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, नऊ प्रकरणांपैकी फक्त नरोडा गावातील हिंसाचाराचे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्यातही अंतिम युक्तिवाद प्रलंबित आहेत. उर्वरित 8 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली असून ती उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपीलाच्या टप्प्यात आहेत. त्यावर न्यायालयाने सांगितले की, नरोडा गाव प्रकरणाची सुनावणी कायद्यानुसार सुरू राहील. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली एसआयटी कायद्यानुसार या प्रकरणात आवश्यक पावले उचलू शकते. 

टॅग्स :GujaratगुजरातSupreme Courtसर्वोच्च न्यायालय