शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रुपाणीनंतर कोण होणार मुख्यमंत्री? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं; मोदी-शहा काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 22:01 IST

विजय रुपाणी यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपचं बैठकांचं सत्र सुरू

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीआधीही भाजपनं मुख्यमंत्री बदलला होता. आताही भाजपनं निवडणुकीला काही महिने राहिले असताना भाकरी फिरवली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह २ मंत्र्यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र आपण या शर्यतीत नसल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे. 

मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. मला ते पद नको, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. पाटील यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर केलं आहे. मात्र यामुळे मुख्यमंत्रिपदाची शर्यत आणखी चुरशीची होणार आहे. पाटील यांच्यासोबतच मनसुख मंडाविया आणि नितीन पटेल यांची नावं चर्चेत आहेत. मंडाविया आणि पटेल यांच्यासोबतच पुरुषोत्तम रुपाला आणि गोरधन जडाफिया यांच्या नावांचीदेखील चर्चा आहे. भाजपच्या आमदारांची बैठक उद्या होत आहे. याच बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल....म्हणून रुपाणींनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; मोदी-शहांच्या गुजरातमध्ये नेमकं चाललंय काय?

रुपाणी यांचा राजीनामा कशासाठी?मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा कशासाठी घेण्यात आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र भाजपनं या निर्णयाची तयारी आधीपासूनच केल्याचं सांगितलं जात आहे. भाजप अशाप्रकारचे प्रयोग करत आला आहे, वेळोवेळी नेतृत्त्व बदल गरजेचा आहे, असं भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हटलं होतं. कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश, पाटीदारांची नाराजी, बेरोजगारी यामुळे रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जात आहे.

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीGujaratगुजरातBJPभाजपा