शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही', मुलीसह लेस्बियन कपलची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 10:45 IST

एका पेपर डिशवर लाल लिपस्टिकने या दोघींनी आत्महत्येचं कारण सांगितलं.

अहमदाबाद- गुजरातमधील एका लेस्बियन कपलने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने त्यांच्यातील एकीच्या तीन वर्षीच्या मुलीलाही नदीत फेकून दिलं. सोमवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, फायर ब्रिगेडच्या पथकाने आशा ठाकोर (वय 30) व भावना ठाकोर (वय 28) यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. आशाची मुलगी मेघाला नदीतून बाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता. पण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आत्महत्येचं कारण या जोडप्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ‘हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करत आहोत’, असं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.एका पेपर डिशवर लाल लिपस्टिकने या दोघींनी आत्महत्येचं कारण सांगितलं. 'हे जग आपल्याला एकत्र राहू देणार नाही. आपण पुन्हा कधी भेटणार? पुढील जन्मातच आपण भेटू शकतो. पुढच्या जन्मात भेटूया. असंही सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आशा व भावना या अहमदाबाद जिल्ह्यातील राजोदा गावातील एका फॅक्टरीमध्ये नोकरी करत होत्या. दोघीही विवाहित असून दोघींची लग्नानंतर ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.दरम्यान, आशाचं दहा वर्षापूर्वी लग्न झालं असून तिला दोन मुली आहेत. भावनाचंही लग्न झालं असून तिला 14 व 13 वर्षीय अशी दोन मुलं आहेत.