शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या उपचारांचा खर्च भागवण्यास मुलगा असमर्थ, संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 18:42 IST

गुजरातमधील जामनगर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. आईच्या उपचारांवरील खर्चाचे बिल भरण्यास असमर्थ ठरल्यानं एका मुलानं आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसहीत कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

ठळक मुद्देगुजरातमधील जामनगरमध्ये संपूर्ण परिवाराची आत्महत्यावयोवृद्ध आईच्या उपचारांवरील खर्च भागवण्यास मुलगा असमर्थकीटकनाशक पिऊन केली कुटुंबीयांची आत्महत्यामृतांमध्ये वयोवृद्ध महिला आणि पाच वर्षांच्या मुलाचाही समावेश

जामनगर - गुजरातमधील जामनगर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. आईच्या उपचारांवरील खर्चाचे बिल भरण्यास असमर्थ ठरल्यानं एका मुलानं आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसहीत कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. दीपक सकारिया (वय 45 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सकारिया यांचे किराणामालाचे दुकान होते. त्यांना आपल्या वयोवृद्ध आईच्या उपचारांवरील खर्चाची रक्कम भरताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आईच्या उपचारांवरील खर्च भागवण्यास आपण असमर्थ आहोत, या विचाराने ते तणावात होते आणि याच तणावातून सकारिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

एसपी शरद सिंघल यांनी सांगितले की, 'सकारिया आणि त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी  31 डिसेंबर 2018 रोजी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली'.

मृतांमध्ये 5 वर्षांच्या मुलाचाही समावेशसूर्यमुखी कॉलनीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले.  दीपक सकारिया (वय 45 वर्ष), त्यांची पत्नी आरती सकारिया (वय 42 वर्ष), मुलगी कुमकुम (वय 11 वर्ष), मुलगा हेमंत (वय 5 वर्ष) आणि दीपक यांची आई जया पन्नाला (वय  80 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याGujaratगुजरात