शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना मोठा धक्का, हायकोर्टानं याचिका फेटाळली, 2 वर्षांची शिक्षा कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 12:02 IST

गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. 

अहमदाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरू आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल घेतली होती. यावर शुक्रवारी गुजरात हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. 

दरम्यान, गुजरात हायकोर्टाने राहुल गांधींना कोणाताही दिलासा दिलेला नाही. गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची 2 वर्षांची शिक्षा कायम राहणार आहे. या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्दच राहणार आहे. त्यामुळे राहुल गांधींसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गुजरात हायकोर्टाने म्हटले आहे की, सुरत कोर्टाचा दोषी ठरवण्याचा आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळला जातो. तसेच, राहुल गांधी यांच्यावरील जवळपास 10 गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत, असेही गुजरात कोर्टाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात "मोदी हे सर्व चोरांचे आडनाव आहे" असे म्हटल्याबद्दल भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या कोर्टात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या लोकांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी म्हटले होते की, 'राहुल गांधींनी असे म्हणत मोदी आडनाव असलेल्या लोकांची बदनामी केली आहे.' याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या कोर्टाने त्यांना जामीन सुद्धा मंजूर केला होता आणि हायकोर्टात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगित केली होती.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण