शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat High Court: 'मनुस्मृती वाचा, मुली वयाच्या 17 व्या वर्षी बाळाला जन्म देत होत्या'; गुजरात उच्च न्यायालयानं का केलं असं भाष्य? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 10:02 IST

या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जूनला ठेवण्यात आली आहे...

'पूर्वी वयाच्या 14 व्या 15 व्या वर्षी लग्न आणि 17 व्या वर्षी आई होणे ही सामान्य गोष्ट होती.' असे भाष्य गुजरात उच्च न्यायालयाने एका 17 वर्षांच्या मुलीचा सात महिन्यांचा गर्भ नष्ट करण्याच्या याचिकेवर केले आहे. गुजरात उच्च न्यायालयाने मनुस्मृतीचा दाखला देत ही मौखिक टिप्पणी केली. लाइव्ह लॉ वेबसाइटनुसार, गुजरात उच्च न्यायालयात एका अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सुनावणी झाली.

यावेळी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती समीर जे दवे तोंडी टिप्पणी करताना म्हणाले, 'आपण 21 व्या शतकात आहोत, आपल्या आई अथवा आजींना विचारा, 14-15 वर्ष हे लग्णाचे वय होते. मूल 17 वर्षांच्या आतच जन्माला यायचं. मुली मुलांच्या तुलनेत लवकर मॅच्योर होतात. आपण हे वाचणार नाही. मात्र यासाठी एकदा मनुस्मृती वाचा.'

गर्भ 7 महिन्यांपेक्षा मोठा - उच्च न्यायालय बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या वकिलाने या प्रकरणी मुलीचे कमी वय पाहता, गर्भपातासंदर्भात भाष्य केले होते. यावर गुजरात उच्चन्यायालयाने वरील भाष्य केले आहे. मात्र, गर्भपात केला जाऊ शकतो का? यासंदर्भात आपण डॉक्टरांचाही सल्ला घेतला होता, कारण गर्भ सात महिन्यांहून अधिकचा आहे. असेही उच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.

याच वेळी, जर अल्पवयीन आणि भ्रूण दोहोंनाही धोका असेल, तर न्यायालय गर्भपाताची परवानगी देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायलयाने अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात गुजरात उच्च न्यायालय डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जूनला ठेवण्यात आली आहे.

 

टॅग्स :GujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालयWomenमहिलाAbortionगर्भपातCourtन्यायालय