शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बिन फेरे हम तेरे! 20 वर्षांच्या तरुणीला 19 वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याची परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 17:22 IST

गुजरात उच्च न्यायालयाकडून प्रेमी युगुलाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी

अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयानं एका 20 वर्षाच्या तरुणीला तिच्या 19 वर्षांच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणात प्रियकर 19 वर्षांचा असल्यानं तो सज्ञान नाही. त्यामुळे आता दोघांचं लग्न होऊ शकत नाही. मात्र तरुणी सज्ञान असल्यानं तिला ज्या व्यक्तीसोबत राहायचं आहे, त्या व्यक्तीसोबत राहण्याचा अधिकार तरुणीला आहे, असं उच्च न्यायालयानं म्हटलं. या तरुणीनं तिच्या आईसोबत राहण्यास ठाम नकार दिला आहे. तरुणीला ज्या ठिकाणी राहायचं आहे, त्या ठिकाणी तिला नेण्याची जबाबदारी पोलिसांची असेल, असं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं. तरुणीच्या प्रियकरानं न्यायालयात लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी अर्ज केला होता. प्रेयसीला तिचे कुटुंबीय आपल्यापासून जबरदस्तीनं दूर ठेवत आहेत. त्यामुळे तिला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले जावेत, अशी विनंती प्रियकरानं केली होती. आपण अद्याप सज्ञान नसल्यानं लग्न करु शकत नाही. त्यामुळे आम्हाला लिव्ह-इनमध्ये राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यानं न्यायालयाकडे केली होती. प्रियकर आणि प्रेयसी वेगवेगळ्या समुदायाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा या नात्यासा विरोध आहे. या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांना शोधून काढलं. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जबरदस्तीनं मुलापासून दूर ठेवलं. मात्र न्यायालयानं या दोघांच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे त्यांना लिव्ह-इनमध्ये राहण्याची परवानगी मिळाली आहे.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टHigh Courtउच्च न्यायालय