शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक कॉपीचं 'गुजरात मॉडेल'; 959 कॉपीबहाद्दरांनी लिहिली चुकीची उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 13:00 IST

बारावीच्या परीक्षेत जोरदार सामूहिक कॉपी

अहमदाबाद: गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सामूहिक कॉपी पकडली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या ९५९ विद्यार्थ्यांना पकडलं. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं कॉपीबहाद्दर पकडले गेले आहेत. परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी गुजरातच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं अनेक पावलं उचलली होती. मात्र तरीही परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी झाली. आता सामूहिक कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाकडून राखून ठेवण्यात आले असून ज्या विषयाच्या पेपरला त्यांनी कॉपी केली, त्या विषयात त्यांना नापास करण्यात आलं आहे. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९५९ विद्यार्थ्यांनी लिहिलेलं उत्तर अगदी सारखं होतं. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं उत्तर इतकं सारखं होतं की या सगळ्यांनी केलेली चूकदेखील सारखीच आहे. जुनागढ, गीर-सोमनाथ भागातील केंद्रावर सामूहिक कॉपीचे प्रकार घडले.एका परीक्षा केंद्रावरील २०० विद्यार्थ्यांनी 'कुटुंबातील मुलीचं महत्त्व' या विषयावर सारखाच निबंध लिहिला. या २०० विद्यार्थ्यांच्या निबंधातील सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा अगदी शब्दनशब्द सारखाच आहे. याशिवाय अकाऊंट्स, इकॉनॉमिक्स, इंग्रजी साहित्य आणि स्टॅटिस्टिक्सच्या पेपरमध्येही कॉपी झाली आहे. यामुळे अमरापूर (गीर-सोमनाथ), विसानवेल (जुनागढ) आणि प्राची-पिपला (गीर-सोमनाथ) भागातील बारावीची परीक्षा केंद्रं रद्द करण्याच्या तयारीत आहे. परीक्षा सुधारणा समितीसमोर काही विद्यार्थ्यांनी कॉपीची माहिती दिली. परीक्षा केंद्रावंर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तरं वाचून दाखवली. त्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपरवर उत्तरं उतरवून काढली. 

टॅग्स :Educationशिक्षणGujaratगुजरात