शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Acharya Devvrat : "हिंदू एक नंबरचे ढोंगी", गुजरातच्या राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:45 IST

Acharya Devvrat : बुधवारी नर्मदा जिल्ह्यातील पोईचा गावात सेंद्रिय शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत हे वक्तव्य केले

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हिंदू ढोंगी असल्याच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बुधवारी नर्मदा जिल्ह्यातील पोईचा गावात सेंद्रिय शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत हे वक्तव्य केले. दोन प्रमुख राज्य वृत्तपत्रांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे.

यामध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटले आहे की, "लोक 'जय गौ माता'चा जप करतात. ते दूध देईपर्यंत गाय गोशाळेत ठेवतात. गाईने दूध देणे बंद केले की ते तिला रस्त्यावर सोडतात. त्यामुळे मी म्हणतो की हिंदू एक नंबरचे ढोंगी आहेत. हिंदू धर्म आणि गाय हे आपापसात जोडलेले आहेत, पण याठिकाणी लोक स्वार्थासाठी 'जय गौ माता' चा जप करतात."

पुढे राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, "लोक देवाची प्रार्थना करण्यासाठी मंदिर, मशिदी, चर्च, गुरुद्वारामध्ये जातात, जेणेकरून देव त्यांना आशीर्वाद देईल. मी म्हणतो की, जर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वाटचाल केली तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल. रासायनिक खतांचा वापर करून तुम्ही प्राणी मारता, हे मी शास्त्रीय पुराव्यानिशी सांगत आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास प्राण्यांना जीवदान मिळेल."

नैसर्गिक शेती या विषयातील पीएचडी कार्यक्रमाचा शुभारंभ गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी रविवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबिलिटी (IIS) येथे गुजरात विद्यापीठातर्फे नैसर्गिक शेती या विषयातील पीएचडी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. गुजरात विद्यापीठात बीएससी, एमएससी, पीएचडी व्यतिरिक्त आता नैसर्गिक शेतीचाही अभ्यास करता येणार आहे. राज्य विद्यापीठात नैसर्गिक शेतीमधील पीएचडी कार्यक्रम हा अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम असेल. त्यात पर्यावरण व्यवस्थापन, नवोपक्रम, उद्योजकता, कृषी उद्योजकता, कृषी व्यवसाय, मूल्य साखळी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

टॅग्स :GujaratगुजरातHinduहिंदू