शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

गुजरातेत राज्यसभेच्या चार जागांची निवडणूक चुरशीची, भाजपचे कोण दोघे निवडून येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 06:41 IST

ही निवडणूक गेल्या मार्च महिन्यात होणार होती. आपण आपल्या तिन्ही उमेदवारांना जिंकून आणू शकतो, अशी भाजपला खात्री होती. याच आत्मविश्वासातून भाजपने काँग्रेसचे पाच आमदार फोडण्यात यश मिळवले व त्यामुळे काँग्रेसचे आमदार ६८ वर आले.

-  शीलेश शर्मा नवी दिल्ली : गुजरातचे कायदामंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांची निवडणूक गुजरात उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे राज्यात राज्यसभेच्या चार जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजपने तीन, तर काँग्रेसने दोघांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.ही निवडणूक गेल्या मार्च महिन्यात होणार होती. आपण आपल्या तिन्ही उमेदवारांना जिंकून आणू शकतो, अशी भाजपला खात्री होती. याच आत्मविश्वासातून भाजपने काँग्रेसचे पाच आमदार फोडण्यात यश मिळवले व त्यामुळे काँग्रेसचे आमदार ६८ वर आले.गुजरात विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत व भाजपला १०३ आमदारांचा पाठिंबा होता. आता भूपेंद्रसिंह चुडासामा यांची निवड रद्द झाल्यामुळे १०२ आमदार झाले.काँग्रेसला अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांचा पाठिंबा आहे. सहा आमदार कमी झाल्यामुळे विधानसभेची सदस्य संख्या १७४ वर आली. यातून हे स्पष्ट झाले की, दुसऱ्या पसंतीची मतेच आता राज्यसभा निवडणुकीचा निकाल निश्चित करतील. यातून काँग्रेस आपले उमदेवार भरतसिंह सोळंकी आणि शक्तिसिंह गोवील यांना विजयी करू शकेल.भाजपने रमिला बेन बारा, नरहरी अमीन आणि अक्षय भारद्वाज यांना रिंगणात उतरवले असून, यातील कोणत्या दोघांना विजयी करायचे हे त्याला ठरवावे लागेल. भूपेंद्र सिंह चुडासामा यांचे सदस्यत्व वाचवण्यासाठी भाजपला सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मागता येईल.ज्येष्ठ विधिज्ञ सिब्बल काय म्हणतात?ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचे म्हणणे असे आहे की, जर उच्च न्यायालयात भ्रष्ट आचरण सिद्ध झाले असेल, तर सर्वोच्च न्यायालय स्थगिती आदेश देणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुडासामा यांना पक्षातून काढून टाकावे व सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निकालाला दाद मागू नये, म्हणजे स्वच्छ राजकारणाचा मार्ग प्रशस्त होईल, अशी सिबल यांची मागणी आहे.भूपेंद्र सिंह चुडासामा यांची निवडणूक टपाल मतपत्रिकांच्या मोजणीत रिटर्निंग अधिकाºयाशी हातमिळवणी करून घोटाळा केल्याचा ठपका ठेवून रद्द झाली आहे.

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातPoliticsराजकारण