शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Electron 2022 Result : जनतेनं गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश दिला, पंतप्रधानांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:46 IST

गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. यानंतर भाजप मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.

गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. यानंतर दिभाजप मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. बोलताना त्यांनी विजयासाठी गुजरातच्या जनतेचे आभार मानले. तसंच निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचेही त्यांनी आभार मानले. “हिमाचल प्रदेशमध्ये एका टक्क्याने मागे राहिली, परंतु विकासासाठी शंभर टक्के कटिबद्ध राहू. भाजपाला लोकांनी मत दिलं कारण भाजपमध्ये मोठे आणि कठोर निर्णय घेण्याचा दम आहे. भाजपला मिळणारं जनतेचं समर्थनच हे दाखवतोय की घराणेशाहीविरोधात लोकांचा राग वाढत आहे. गुजरातच्या जनतेनं रेकॉर्डब्रेक मतं दिली आहे. गुजरातमध्ये एक कोटीपेक्षा अधिक मतदारांनी मतदान केलं,” असं मोदी म्हणाले.

“भाजपला मिळणारं समर्थन घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेचा वाढणारा आक्रोश दाखवत आहे. गुजरातच्या जनतेनं रेकॉर्ड तोडण्याचाही रेकॉर्ड केला आहे. गुजरातच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. भाजप आता गुजरातच्या प्रत्येक कुटुंबाचा आणि घरातील भाग आहे,” असं मोदी म्हणाले.“भाजपला मिळालेलं जनतेचं समर्थन भारताच्या नव्या आकांक्षांचं प्रतिबिंब आहे. हे तरुण विचाराचं प्रकटीकरण आहे. भाजपला जे समर्थन मिळालं ते गरीब, शोषित, वंचित, आदिवासींच्या सशक्तिकरणासाठी मिळालंय. लोकांनी भाजपला मत दिलं कारण भाजप प्रत्येक सुविधा प्रत्येक गरीब, मध्यमवर्गीय लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवायच्या आहेत. लोकांनी भाजपला मत दिलं कारण भाजप देशाच्या हितासाठी मोठे आणि कठोर निर्णय घेण्याचं धाडस ठेवते,” असंही ते म्हणाले.गुजरातचे निकाल त्याचेच परिणामआज आम्ही गुजरातचे लोक, 'गुजरातच्या कार्यकर्त्यांसह आम्ही हिमाचलमधील कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. गुजरातचा भव्य आणि ऐतिहासिक विजय हा 'सबका साथ, सबका विकास' या मूळ मंत्राचा परिणाम आहे. हा मंत्र पंतप्रधानांनी दिला. त्यांनी ज्या प्रकारे गुजरातसह देशातील जनतेची सेवा केली आहे. आज गुजरातचे निकाल त्याचाच परिणाम आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली.

'गुजरातमध्ये एक नवा पक्ष (आम आदमी पार्टी) आला, त्यांचे नेते (अरविंद केजरीवाल) एक पेपर घेऊन आले, भविष्यवाणी केली. गुजरातमध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार येणार आहे, हे लक्षात घेण्याचे सांगितले. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा असा बेजबाबदार नेता. आज गुजरातच्या निकालानंतर त्यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागावी, असं नड्डा यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022