शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election Results 2022 : केजरीवालांनी ज्या 3 नेत्यांची नावं चिठ्ठीवर लिहिली होती, जाणून घ्या गुजरात निवडणुकीत त्यांचं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 16:47 IST

एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका कागदावर आपल्या तीन नेत्यांची नावे लिहून, गुजरात निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा दावा केला होता.

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे, तर काँग्रेस आपल्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. यातच, गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. यांपैकी पाच जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

दरम्यान एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका कागदावर आपल्या तीन नेत्यांची नावे लिहून, गुजरात निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा दावा केला होता. यात आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी, प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि अल्पेश कथिरिया यांची नावे होती. आम आदमी पक्षाचे हे तीनही नेते निवडणुकीत पराभूत होताना दिसत आहेत.

इसुदान गढवी पिछाडीवर - देवभूमी द्वारका येथील खंभालिया जागेवर आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांना उमेदवारी देण्यात आली. या जागेवर भाजपचे उमेदवार मुलुभाई बेरा उभे आहेत. येथे भाजपच्या उमेदवाराने गढवी यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.

गोपाल इटालिया यांचा पराभव -आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया हे गुजरातमधील कतरगाम विधानसभा जागेवरून मैदानात उतरले होते. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या विजयाचाही दावा केला होता. या जागेवर भाजपचे विनू मोरडिया यांना 110515 तर गोपाल इटालिया यांना 49856 मते मिळाली आहेत. भाजपने ही जागा 60,659 मतांनी जिंकली आहे.

अल्पेश कथिरिया -पाटीदारांचा गड मानल्या जाणाऱ्या वराछा जागेवर पटेल आरक्षण आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेले अल्पेश कथिरिया आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक मैदानात उतरले होते. अरविंद केजरीवाल यांनी अल्पेश कथिरिया यांच्या विजयाचाही दावा केला होता. मात्र, येथेही भाजप उमेदवार किशोर कनाणी मोठ्या संख्येने आघाडीवर आहेत.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी