शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"मी दहशतवादी आणि भ्रष्टाचारी असेल तर अटक करा", अरविंद केजरीवालांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 18:18 IST

अरविंद केजरीवाल गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत.

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वतःला भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून दाखवत आहे. तसेच, अरविंद केजरीवाल भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता अरविंद केजरीवाल यांनी आज एका ट्विटद्वारे भाजपवर हल्लाबोल केला. भाजप आपल्याला गोवण्याचा कट रचत असल्याचे केजरीवाल म्हणाले.  अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून लिहिले, 'केजरीवाल दहशतवादी आहे. एचएमने तपास सुरू केला होता. त्याचे काय झाले? आता गुजरात/एमसीडीमुळे केजरीवाल भ्रष्ट झाले आहेत. केजरीवाल दहशतवादी किंवा भ्रष्ट असेल तर अटक का नाही केली? केजरीवाल दहशतवादी किंवा भ्रष्ट नाही. केजरीवाल जनतेचा लाडका आहे,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले. 

आपकडून जोरदार तयारी सुरूआपकडून इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे. इसुदान गढवी हे AAP चे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील आहेत. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या मुख्यालयात होणार आहे. या बैठकीत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटीलही सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल