अहमदाबाद : हिमाचल प्रदेशच्या निवडणूक प्रचारापासून दूर राहिलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी गुजरातच्या निवडणूक रणांगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या २१ किंवा २२ नोव्हेंबरला राहुल गांधी यांची प्रचारसभा गुजरातमध्ये होण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा २० नोव्हेंबरला संपणार आहे. भारत जोडो यात्रेला २१ व २२ नोव्हेंबर विश्रांतीचे दिवस आहेत. या काळातच काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातमध्ये प्रचाराला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यासाठीसुद्धा विश्रांतीच्या दिवसांमध्ये गुजरातमध्ये प्रचाराला राहुल गांधी वेळ देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Gujarat Election 2022: राहुल गांधी यांची गुजरात प्रचारात ‘एन्ट्री’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:43 IST